Site icon MarathiBrain.in

३३ नवी लढाऊ विमाने घेण्याचा हवाई दलाचा प्रस्ताव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाने (आयएएफ) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे ३३ नवी राशियायी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमुळे भारत आणि चीनमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली असताना, हवाई दलाचा प्रस्ताव देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे. नव्या प्रस्तावित विमानांच्या यादीत २१ ‘मिग-२९’ (MiG-29) व १२ सुखोई-३० (Su-30MKI) या लढाऊ विमानांचा समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र

भारतीय हवाई दलाची अनेक विमाने वेगवेगळ्या अपघातात दुर्घटनाग्रस्त झाली असून, त्यांच्या जागी नव्या विमानांची गरज भासू लागली आहे. त्यामुळे, हवाई दलाने ३३ नव्या लढाऊ विमानांच्या खरेदीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवले आहे. परिणामी भारत रशियाकडून २१ ‘MiG-29’ लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. रशियाने भारतीय हवाई दलाल या विमानात अपेक्षित असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासनही दिले आहे.

एएनआयला शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “हवाई दल गेल्या बऱ्याच काळापासून या प्रस्तावावर काम करत होतेे, पण आता या प्रक्रियेत गती आली आहे. यासाठी अंदाजे एकूण सहा हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. हा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत संमतीसाठी सादर केला जाणार आहे.”

दरम्यान, भारताने गेल्या १० ते १५ वर्षांत विविध गटांतून सुमारे २७२ ‘Su-30MKI’ लढाऊ विमाने ऑर्डर केली आहेत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते की भारताकडे आतापर्यंत असलेली लढाऊ विमाने पुरेशी असून, हवाई दलाची उच्च वजनी लढाऊ विमानांची गरज पूर्ण करतात.

हेही वाचा : ‘तेजस एमके-१’ लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या स्वाधीन

दुसरीकडे, एएनआयने काल प्रकाशित केलेल्या वृत्तसारखेच वृत्त २९ ऑगस्ट २०१९ लाही प्रकाशित केले होते. त्यामुळे, हवाई दलाने सादर केलेल्या नव्या लढाऊ विमानांसाठीचे प्रस्ताव आताचे आहे की जुनेेेच आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

 

◆◆◆

Exit mobile version