आयसीआयसीआय बँकेचे मुख्यालय मुंबईत स्थलांतरित होणार

ब्रेनवृत्त, मुंबई

गुजरातमधील वडोदऱ्यातील आयसीआयसीआय बँकेचे मुख्यालय मुंबईत हलवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात आयसीआयसीआय बँकेचे भागधारक मोठ्या प्रमाणावर असल्याने बँकेच्या संचालक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयसीआयसीआयने त्या प्रमाणे मुंबई शेअर बाजाराला (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (NSE) याबाबतची माहिती दिली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकित सर्वानुमते बँकेचे मुख्यालय वडोदऱ्याहून मुंबईला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातमधील मुख्यालय मुंबईत हलवल्यामुळे आयसीआयसीआय बँक महामंडळ प्राप्तिकर (कार्पोरेट इनकम टॅक्स) मुंबईला देणार आहे. त्याचबरोबर, बॅंकेच मुख्यालय मुंबईत हलविल्याने केंद्रीय करात वाढ होणार असून, तो कर महाराष्ट्रात येणार आहे. सोबतच, मोठ्या कार्पोरेट कर्जावरील ‘मुद्रांक शुल्क’ (स्टॅम्प ड्युटी) देखील महाराष्ट्रात भरली जाणार आहे.  त्यामुळे, या निर्णयाला भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ना हरकत प्रमाणपत्र (NOC)  दिलं आहे.

हेही वाचा : ऑनलाइन व्यवहार अयशस्वी झालेल्यांना मिळणार दरदिवशी १०० रुपये

दरम्यान, बँकेने मुख्यालय मुंबईत हलवण्यात येणार असल्याची घोषणा केली असली, तरी  बँकेचे कोणतेही कर्मचारी किंवा वडोदऱ्यातील कोणत्याच व्यवसायात बदल केला जाणार  नाही. हा बदल फक्त कागदोपत्री करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली  आहे.  दुसरीकडे, बँकेचं मुख्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हलविण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते, तसेच काही औपचारिकताही पूर्ण कराव्या लागतात. त्या बँकेद्वारे पूर्ण केल्या जाव्यात, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: