अखेर मॉडर्नाच्या लसीला भारतात मान्यता!
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
भारताच्या औषधे महानियंत्रकाकडून (DCGI) मॉडर्नाच्या लसीला भारतात मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. एक अनामिक सूत्रांकडून पीटीआयला मिळलेल्या माहितीनुसार, भारतात मॉडर्नाची कोरोना विषाणू लस आयात करण्यासाठी सिप्ला (Cipla) कंपनीला स्वीकृती मिळाली आहे.

कोव्हॅक्स अभियानाअंतर्गत भारताला लस दान करण्यासंबंधी अमेरिका आणि भारतात करार झाल्यानंतर मॉडर्नाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळवण्यासाठी भारताला अर्ज सादर केले होते. या अमेरिकी औषधनिर्माण कंपनीच्या वतीने सिप्लाने मॉडर्नाची लस भारतात आयात करण्याची व वापराची परवानगी मिळवाण्यासाठी औषध नियंत्रकाकडे विनंती केली होती.
वाचा | न्यूमोनियावरील पहिल्या स्वदेशी लसीला अंतिम मान्यता !
डीसीजीआयच्या (Drugs Controller General of India) नव्या धोरणानुसार, युरोपीय संघाच्या औषध नियामकासाठी युएसने ज्या औषधांना मान्यता दिली आहे, त्या औषधांना भारतात विनाचाचणी मान्यता दिली जाईल. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणून संबंधित लसीचे प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्याआधी सुरुवातच्या १०० लाभार्थ्यांच्या सुरक्षेच्या माहितीची नोंद घेण्यात येईल.
Moderna's COVID-19 vaccine granted restricted emergency use authorisation by India's drug regulator:: Govt
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2021
कोव्हिड-१९ लसीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीने म्हणून भारताच्या औषध महानियंत्रकाने १ जून रोजी विदेशी लसींना ब्रिज-टेस्टिंगमधून मोकळीक दिली आहे. पण यासाठी ह्या विदेशी लसींना यूएसच्या एफडीए, युकेच्या एमएचआरए किंवा डब्ल्यूएचओ या आंतरराष्ट्रीय नियामकांकडून मान्यता मिळालेली असणे आवश्यक आहे. भारत शासन मॉडर्नाची लस भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्नात होते.
हेही वाचा | कोरोनाची लाट अद्याप संपलेली नाही : आरोग्य मंत्रालय
लस निर्मितीत क्रांतिकारी ठरलेल्या संदेशक आरएनए (mRNA) तंत्रज्ञानाद्वारे विकसित मॉडर्नाच्या लसीला अमेरिका व युकेच्या औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे. या लसीची कोरोना विषाणू विरोधात लढण्याची कार्यक्षमता ९०% आहे.
अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.
फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.
तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.