टी-२० विश्वचषकाचा प्रवास संपला!

मराठीब्रेन । ऑनलाईन

ब्रेनवृत्त । अबुधाबी


स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच अपयश हाती आलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा (T20 World Cup 2021) प्रवास अखेर संपला आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघात झालेल्या आजच्या अंतिम सुपर-१२ सामन्यात न्यूझीलंड संघाने अफगाणिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला आणि अफगाणिस्तानसह भारतही उपांत्य फेरीपूर्वीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांदरम्यान सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामना खेळाला गेला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत ८ गडी गमावत १२४ धावांचे लक्ष्य न्यूझीलंड संघाला दिले. न्यूझीलंड संघाने निवांतपणे खेळात १९ षटकांत ८ गडी राखत अफगाणिस्तानवर विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे.

वाचा >>> “संघ थकला आहे, खेळाडूंना विश्रांती हवी असते!”

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान क्रिकेट सामन्याच्या आधीपासूनच क्रिकेट प्रेमींमध्ये विविधांगी चर्चांना उधाण आले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत करण्यासाठी अफगाणिस्तानचे जिंकणे आवश्यक होते आणि यासाठी कित्येकजण कामनाही करत होते. परंतु, न्यूझीलंड संघाने आज अफगाणीस्तानवर मिळवलेल्या एकहाती यशामुळे  अफगाणिस्तानसह भारताचाही या विश्वचषकाचा पुढचा प्रवास संपला आहे. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: