भारत वैश्विक ऊर्जा गुणक होण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

जागतिक स्तरावर नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहित करण्याऱ्या जगातील सर्वांत सक्रिय देशांपैकी भारत एक असून, भारतात वैश्विक ऊर्जाबळ गुणक (Force Multiplier) होण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले

 

वृत्तसंस्था | नवी दिल्ली

ब्रेनवृत्त संपादन | सागर बिसेन

शाश्वत विकास ध्येयांविषयी भारताच्या वैश्विक वचनबद्धतेला धक्का न पोहचवता ऊर्जा न्याय (Energy Justice) सुनिश्चित करण्याचे देशाच्या ऊर्जा योजनेचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले. CERAWeek द्वारे आयोजित चौथ्या भारत ऊर्जा मंचाच्या (India Energy Forum) उद्घाटनाप्रसंगी भारताच्या उर्जाक्षेत्राविषयी माहिती देताना ते बोलत होते.

जागतिक स्तरावर नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहित करण्याऱ्या जगातील सर्वांत सक्रिय देशांपैकी भारत एक असून, भारतात वैश्विक ऊर्जाबळ गुणक (Force Multiplier) होण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होऊन भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा ऊर्जा गुणक होईल. यासाठीच्या आमच्या प्रयत्नांमध्ये ऊर्जा सुरक्षितता हे केंद्रीय बाब आहे.”

CERAWeek द्वारे चौथ्या भारत ऊर्जा मंचाचे (India Energy Forum) आयोजन

वाचा | प्रदूषणासाठी बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना ₹२८६ कोटींचा दंड

सोबतच, स्वदेशी विमानचालना (Domestic Aviation) उद्योगांत भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी आणि सर्वाधिक गतीने वाढत जाणारी बाजारपेठ असल्याचेही मोदींनी मंचाला संबोधित करताना म्हटले.

“कमी कार्बन फुटप्रिंटसह आमचे ऊर्जा क्षेत्र वाढ केंद्रीत, उद्योग अनुकूल आणि पर्यावरणाची जाणीव असलेले आहे”, असेही मोदींनी परिषदेत उपस्थित अनेक राष्ट्रांच्या ऊर्जा प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले. भारताचे ऊर्जा धोरण ऊर्जा न्याय सुनिश्चित करण्याच्या दिशेने वाटचाल करणारे असून, वैश्विक पातळीवर देशाने ठरवलेल्या शाश्वत ध्येयांच्या वचनबद्धतेला कोणताही धक्का न लागता हे न्याय मिळवून दिले जाईल, अशी प्रतिबद्धता मोदींनी यावेळी व्यक्त केली.

वाचा | अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना

भारताच्या ऊर्जा संरक्षणाविषयीच्या प्रयत्नांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “मागील सहा वर्षांत देशात ११ मिलियनपेक्षा एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. यामुुुळे वर्षाला अंदाजे ६० बिलियन युनिटची ऊर्जा वाचवणे शक्य झाले आहे. या उपाययोजनेमुळे वर्षाला कार्बन डायॉक्साईडच्या ४.५ कोटी टन हरित गृह उत्सर्जन कमी करण्यास मदत होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: