अमेरिकेत चिनी दूतावाससमोर भारतीय अमेरिकी लोकांचे निदर्शन
वृत्तसंस्था | वाशिंग्टन
वाशिंग्टन व वाशिंग्टन शहराच्या बाहेरील भारतीय अमेरिकी लोकांच्या समूहाने अलीकडे चीनने केलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कृत्याचा व ‘कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनस्थित चिनी दूतावाससमोर रविवारी शांतीपूवर्क निदर्शने केली. चीनविरोधात घोषणा फलक व ‘China Communist : Down Down’ अशी नारेबाजी करत निदर्शकांनी चीनचा निषेध नोंदवला.
मेरीलँड, वर्गीनीया आणि वॉशिंग्टन डीसी इत्यादी शहरांतील भारतीय अमेरिकी लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधित्व असलेल्या या शांतीपूवर्क निदर्शनात कोरोना विषाणूूूच्या संक्रमाणावरून चीनचा निषेेेध व्यक्त करण्यात आला. निदर्शक म्हणतात, “चिनी विषाणूने जगभरातील लाखों लोकांचे जीव घेतले आहे व वैश्विक अर्थव्यवस्था ठप्प केली आहे.”
निदर्शनात सहभागी सामाजिक कार्यकर्ते मनोज श्रीनिलायम म्हणतात, “कोव्हिड-१९ ने आधीच जग विस्कळीत झाले असताना, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या कुरापती, जमीन हडपणे तसेच भारतीय भूभाग असलेल्या लडाखमध्ये भारतीयांंचा घेतलेला जीव, या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो.” गेल्या काही दशकांपासून चीन भारत व इतर लहान देेशांना दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, दुसरे सहभागी कार्यकर्ते महिंद्र सपा म्हणाले.
पुढे सपा निषेध नोंदवत म्हणतात, “दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन अवैधरित्या जमिनीवर ताबा मिळवतो आहे आणि लहान लहान देशांच्या बेटांवर आपला हक्क सांगतो आहे. आम्ही इथे जगाला सांगण्यासाठी व जागरूकता निर्माण करण्यासाठी आलो आहोत, की उर्वरित जगाने चीनशी असलेले आर्थिक संबंध मोडीत काढावे आणि वृद्धी साधावी.”
या निदर्शनात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांनी भाग घेतला होता. यामध्ये मुख्यत्त्वाने ग्रेटर वॉशिंग्टनस्थित केरळ संघटना, दुर्गा मंदिर मित्रमंडळ, हॉवर्ड काउन्टीमधील तामिळ सांस्कृतिक गट व भारतीय सांस्कृतिक संघटना, राष्ट्रीय आशियायी भारतीय संघटन परिषद, विश्व हिंदू परिषद, अमेरिका यांचा समावेश होता. नुकतीच न्यूयॉर्कमध्ये स्थापन करण्यात आलेली ‘चिनी साम्राज्यवाद विरोध समूह २३’ या संघटनेनेही आपले प्रतिनिधी निदर्शनात सहभागी होण्यासाठी पाठवले होते.
मागील काही आठवड्यांपासून अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये चीनच्या विरोधात अशी अनेक शांतीपूवर्क निदर्शने आयोजित केली जात आहेत. मागील आठवड्यात ‘चिनी साम्राज्यवाद विरोध समूह २३’ने ‘चिनी साम्राज्यवाद’ या विषयावर आधारित वेबिनार आयोजित केले होते. यामध्ये भारताचे माजी राजदूूत गौतम बंबावले आणि सेेबीचे माजी अध्यक्ष डी. आर. मेहता यांनी मार्गदर्शन केले होते.