परदेशातील सर्वात जास्त पैसे येतात भारतात!

मराठी ब्रेन

०९ डिसेंबर, २०१८

परदेशातून मायदेशी पैसे पाठवणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारताने आपले स्थान अबाधित राखत यावर्षीही प्रथम क्रमांक मिळवले आहे. जागतिक बँकेच्या (वर्ल्ड बँक) अहवालानुसार, यावर्षी परदेशात असलेल्या भारतीयांनी ८० अब्ज डॉलर मायदेशी पाठवले आहेत. या यादीत भारतनंतर चीन आणि मेक्सिकोचा क्रमांक लागतो.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीय परदेशी नागरिक मायदेशात सर्वात जास्त पैसे पाठवतात.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक बँकेने ‘स्थलांतर आणि मायदेशी पाठवलेली रक्कम’ (‘माईग्रेशन अँड रेमिटन्स) या नावाने जगभरातील स्थलांतरितांनी त्यांच्या मायदेशी पाठवलेल्या पैशांचा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, परदेशातील भारतीय नागरिकांद्वारे भारतात सर्वात जास्त पैसे पाठवण्यात येतात हे स्पष्ट झाले आहे. विविध देशांच्या या क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत भारताने मागील वर्षीचे आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. यावर्षी विदेशात स्थलांतरीत भारतीयांनी ८० अब्ज डॉलर भारतात पाठवले आहेत. या यादीतनचीनचा दुसरा क्रमांक असून, चीनी नागरिकांनी आपल्या देशात परदेशातून ६७ अब्ज डॉलर रूपये पाठवले आहेत. भारत आणि चीनच्या नंतर मॅक्सिकोचा तिसरा क्रमांक लागतो. मॅक्सिकोचे नागरिक हे त्यांच्या मायदेशी ३४ अब्ज डॉलर पाठवतात. तर फिलिपिन्स आणि इजिप्तचे नागरिक अनुक्रमे ३४ व २६ अब्ज डॉलर आपल्या देशात पाठवतात.

वर्ल्ड बँकेच्या ‘माइग्रेशन अँड रेमिटेंस’च्या अहवालानुसार, विकसनशील देशांना अधिकाधिक प्रमाणात पैसे पाठवण्यात २०१७ मध्ये १०.८ टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच तब्बल ५२८ अब्ज डॉलर इतकी रक्कम मायदेशांत पाठवली जाते. मागील वर्षी वाढीची टक्केवारी ७.८ इतकी होती. बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या नागरिकांनी आपल्या देशात पाठवलेल्या पैशात अनुक्रमे ७.९ आणि ६.२ टक्के वाढ झाली आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, जगभरातील काळा पैसा यावर्षी १०.३ टक्कांनी वाढून ६८९ अब्ज डॉलर इतका झाला असण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये परदेशात काळा पैसा पाठवण्याचा जीडीपी २.७ टक्के वाटा होता. भारतात येणाऱ्या परदेशी पैशांमध्ये संयुक्त अरब अमिरात (यूएई) देशाचा सर्वात मोठा वाटा आहे. वाढलेले इंधन दर यामुळे या देशात पैसे कमावण्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत युएईमधून भारतात पाठवण्यात आलेल्या पैशांत तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: