न्या. ललित यांचा मुख्यमंत्री रेड्डी यांच्याविरूद्धच्या सुनावणीत सहभागी होण्यास नकार

सर्वोच व उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशांवर  विनाधार आरोप केल्याप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री  वाय. एस. जगनमोहन रेड्डी व राज्य शासन यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे.

 

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली 

सर्वोच न्यायालयाचे न्यायमूर्ती यु. यु. ललित यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी व राज्य शासन यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणीत अपात्रतेच्या कारणावरून सहभागी होण्यास नकार (recused) दिला आहे.

सर्वोच व उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशांवर आरोप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री रेड्डी व राज्य शासन यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती यु. यु. ललित, न्या. विनीत सरन व न्या. एस. रवींद्र यांच्या तीन सदस्यीय पीठासमोर प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी न्या. ललित म्हणाले, “वकील म्हणून मी या पक्षांचे खटल्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे हे प्रकरण मी हाती घेऊ शकत नाही. त्यामुळे सरन्यायाधीश ज्यांना नेमतील त्यांच्या समोर या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी होऊ द्या.”

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या पीठासीन न्यायाधीशांविरुद्ध आरोप करणारे एक पत्र सरन्यायाधीशांना लिहिले होते. मात्र, रेड्डी यांनी या पत्रातील मजकूर माध्यमांकडेही जाहीर केले. मुख्यमंत्री रेड्डी यांचे हे कृत्य न्यायालयाचा अवमान असल्याचे सांगत, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अवमान कारवाई सुरू करावी, अशी याचिका जी. एस. मनी, सुनील कुमार सिंग व भारतीय लाचलुचपत प्रतिबंधक परिषद विश्वस्त संस्था (Anti-Corruption Council of India Trust) सर्वोच्च न्यायालयात सादर केली.

हेही वाचा | प्रचारक ठरवणे तुमचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खडसावलेला

कोणताही आधार अथवा पुरावे नसताना न्यायालयाच्या पीठासीन न्यायाधीशांवर आरोप करणे हे न्यायालयाचा अवमान कायद्याच्या परीदृश्यात येते, असे याचिकेत म्हटले आहे. कोणत्याही आधाराविना न्यायाधीशांवर आरोप करण्याच्या कृत्यासाठी वाय. एस. रेड्डी यांच्यावर न्यायालयाने का कारवाई करू नये? असे कारणे दाखवा नोटीस रेड्डी यांना न्यायालयाने जाहीर करावे, अशी मागणी सुनील कुमार सिंग यांनी याचिकेत केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: