धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते खुशाल बापू यांचे निधन!
प्रतिनिधी । धुळे
ब्रेनवृत्त । १४ ऑक्टोबर
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील सुविख्यात ज्योतिषतज्ज्ञ तसेच वारकरी संप्रदायाचे जेष्ठ पाईक ह. भ. प. खुशालसिंगजी डोंगरसिंग गिरासे यांचे काल (बुधवारी) सकाळी त्यांच्या राहत्या घरी तावखेडा येथे वृद्धपकाळामुळे निधन झाले. धुळे जिल्ह्यात त्यांना ‘खुशाल बापू’ म्हणूनच ओळखले जात असे.
जोतिष्यशास्त्र तसेच वारकरी संप्रदायात वावरणारे खुशाल बापु यांनी सामाजिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले. वारकरी संप्रदायावर त्यांची फार निष्ठा होती. दीन-दुबळ्या समाजातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेकांना व्यसनाच्या मार्गातून मुक्त करून वारकरी संप्रदायाच्या माध्यामातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बापूंनी केले. बापूंच्या जाण्याने शिंदखेडा तालुक्यातील सोलंकी कुटुंब तसेच तावखेडा ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
तिरोडा शहर हादरले; गोंदिया जिल्ह्यात एकाच कुटुंबात चौघांची हत्या!
सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या बापूंनी जिल्ह्यातील माळमाथ्या परीसरातील बहुतांश अदिवासी बांधवांना वारकरी केले. पण त्यांना स्वतःला राजकारणापासून मात्र अलिप्त ठेवले. त्यांचा दशक्रिया विधी दिंनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता तावखेडा प्रन येथे पार पडणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in