लाखों मुंबईकरांना झाला कोरोना, पण कळलंच नाही !

थायरोकेअरने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक नमुने गोळा करून तपासणी केली. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे आणि त्यातून ते आपोआप बरेही झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

‘गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने धास्तावलेल्या लाखो मुंबईकरांना कोरोना होऊन बराही झाला आहे, आणि त्यांना ते कळलंही नाही!’, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील खासगी प्रयोगशाळा आणि थायरोकेयर लॅब बरोबरच सिरो सर्वेक्षण या अधिकृत संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात  मुंबईतील काही भागांमध्ये कोरोना विषाणू संदर्भात दहा हजार लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. मात्र, त्याचे संख्यात्मक विश्लेषण पुढील दोन दिवसात कळणार आहे. थायरोकेअर लॅबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांनी देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे. थायरोकेअरने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक नमुने गोळा करून तपासणी केली. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे आणि त्यातून ते आपोआप बरेही झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

हेही वाचा | ‘कोव्हिड-१९’चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात !

त्याचप्रमाणे, एका खासगी लॅबमध्ये काही लोकांची प्रतिपिंड चाचणी (अँटिबॉडी टेस्ट) केली असता त्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी केली नाही, अशा नागरिकांच्या शरीरात सध्या प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार होत आहेत. तसेच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर कोरोना होऊन आपोआप बराही झाला आहे. मात्र त्यांना कोरोनाची लागण  झाल्याचं कळलंही नाही, अशी धक्कादायक माहिती या सर्वेक्षणातून कळली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या परवानगीनंतर सरकारी प्रयोगशाळा आणि खाजगी प्रयोगशाळांनी एका महिन्यात केलेल्या निरीक्षणातील हा अहवाल असल्याचं वेलूमनी यांनी सांगितलं आहे.

वाचा | मुंबईकरांसाठी लुपिनची ‘जन कोविड हेल्पलाइन’

दरम्यान, ज्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी केली, त्यांना कोरोना झाल्याच स्पष्ट होत आहे. तसेच, संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण झाली असल्याच समोर येत आहे. मात्र ज्यांची चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली आहे, पण कोणतीही लक्षणं नसणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा एका बाजूला वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: