Site icon MarathiBrain.in

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे वृद्धापकाळाने निधन!

ब्रेनवृत्त । मुंबई


शहरातील पी. डी. हिंदुजा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.  वयाशी संबंधित वैद्यकीय समस्यांवर उपचार घेण्यासाठी त्यांना गेल्या आठवड्यात हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याही आधी काही दिवसांपूर्वी त्यांना सारख्याच कारणावरून ह्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांची पत्नी सायरा बानू यांनी एक ट्विट  करून चाहत्यांना दिलीप कुमार बरे होऊन लवकर परत यावेत यासाठी प्रार्थना करण्यास आवाहन केले होते. श्वासोच्छवासात होणाऱ्या त्रासामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना जूनमध्ये हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वाचा । सुप्रसिद्ध कवी डॉ. राहत इंदौरी यांचे निधन !

“देवाने दिलीप साहेबांवर असीम दया दाखवली असून यांच्या प्रकृती सुधारत असल्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आम्ही अद्याप रुग्णालयात आहोत आणि  आम्ही तुम्हाला विनंती करतो, की त्यांच्यासाठी प्रार्थना व दुवा द्या, जेणेकरून इंशा अल्लाह त्यांना त्वरित निरोगी करून रुग्णालयाच्या बाहेर पडण्यास मदत करेल”, असे ट्विटमध्ये म्हटले होते. 

जूनमध्ये जेव्हा दिलीप कुमार यांना दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्यांच्यावर बायलॅटरल प्ल्युरल इफ्युजनचे (फुफ्फुसांच्या बाहेरील प्लुराच्या थरांमध्ये जास्तीत जास्त द्रवपदार्थ निर्माण होणे) निदान करण्यात आले होते. तसेच, त्यांच्यावर फुफ्फुसांच्या एस्पायरेशन प्रक्रिया  यशस्वी पार पाडण्यात आली होती आणिपाच दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. 

मनोरंजन क्षेत्रातील अधिक घडामोडींसाठी  — >> ब्रेनरंजन 

हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांनी जवळपास पाच दशकांची कारकीर्द गाजवली आहे. दिग्गज दिलीप कुमार यांच्या यशोमय कारकिर्दीत  “मुगल-ए-आजम”, “देवदास”, “नया दौड़” आणि “राम और श्याम” सारख्या अतिप्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.  मोठ्या पडद्यावरील त्यांची शेवटची भूमिका त्यांनी 1998 मध्ये ‘किला’ या चित्रपटातून साकारली होती. 

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

 

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

Exit mobile version