मुंबईत अखंड वीज पुरवठ्यासाठी नवे वीज निर्मिती केंद्र उभारण्याचा प्रस्ताव

मुंबईतील विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये, या उद्देशाने उरण येथील वायू विद्युत निर्मिती प्रकल्पात नवे केंद्र उभारून ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

 

ब्रेनवृत्त|मुंबई

भविष्यात मुंबईतील वीज पुरवठा खंडीत होऊ नये या उद्देशाने उरण येथील विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. यासाठी किमान एक हजार मेगावॉट क्षमेतचे नवे केंद्र येत्या दोन वर्षांत उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मित केंद्रातील खाली जागेवर नवे युनिट उभारून, ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ केली जाणार आहे. संबंधित निर्णयाची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेटीच्या वेळी दिली. हा प्रकल्प येत्या २ वर्षांत पूर्ण करण्याचा मानस असून, यासंदर्भात लवकरात लवकर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी महाजनकोला दिल्या आहेत.

राऊत यांनी विद्युत निर्मिती केंद्राला दिलेल्या भेटीच्या वेळी या केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली. तसेच, त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले.

“12 ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने आणि मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. हे टाळण्यासाठी उरण येथे किमान एक हजार मेगा वॅटचा वीज प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असे राऊत यांनी सांगितले.

वाचा | अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना

● मुंबईची विद्युत गरज

अति व्यस्त कालावधीत (Peak Hours) मुंबईत  सध्या वीजेची गरज 2500 मेगा वॅट आहे आणि 2030 ला ही गरज 5 हजार मेगावॅटपर्यंत पोहचेल. सध्या सर्व कंपन्या मिळून मुंबईसाठी केवळ 1300 मेगावॅटची वीज निर्मिती करतात. मात्र, सद्यस्थिती बघता गरजेपेक्षा निर्मिती क्षमता खूप कमी आहे आणि विद्युत क्षमता वाढविण्याची मुंबईला गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: