देशातील सर्वात मोठी कर्जमाफी भाजपच्या काळात : मुख्यमंत्री फडणवीस

प्रतिनिधी, जळगाव

२३ ऑगस्ट २०१९

आतापर्यंतची देशातील  सर्वात मोठी कर्जमाफी भाजप सरकारच्या काळात झाली आहे आणि अजूनही करीत  आहे, अशी स्पष्टोक्ती  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात जळगाव मध्ये आयोजित सभेत ते काल बोलत होते.

भुसावळ येथे आयोजित महाजनादेश यात्रेचे क्षणचित्र

राज्यात विविध ठिकाणी आलेल्या महापुरामुळे विश्रांती घ्यावी लागलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ही यात्रा काल शुक्रवारी जळगाव येथे पोहचली. जळगावमध्ये आयोजित सभेत  जनतेला संबोधित करताना देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी भाजप सरकारच्या काळात झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले  आहे.  “मागील पाच वर्षांत जनतेने आमचे मूल्यमापन केले आहे. म्हणूनच जनता आमच्या पाठीशी आहे. देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी भाजपाने केली असून आणि अजूनही कर्जमाफी करीत आहे”, असे फडणवीस यावेळी म्हणाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने 1200 कोटींचे कर्ज माफ केले होते, मात्र आम्ही 10 हजार कोटींची कर्जमाफी केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांसाठी २१ लाख राख्या!

खादेशातील जनतेचा विश्वास संपादित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “शहर असो किंवा जिल्हा वर्षानुवर्षे आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे आम्ही निधीही कधीच कमी पडू देणार नाही. जळगाव जिल्हाच नव्हे, तर अवघा खानदेश नेहमी आमच्या पाठीशी उभा राहिला आहे.” विभागात रखडलेल्या विविध प्रकल्पांसाठी संपूर्ण निधी देण्यात येणार असून, जिल्ह्याचा पाणीप्रश्नाही सुटणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाची पूरग्रस्तांना मदत नव्हे, तर थट्टाच !

सभेत उपस्थित असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. महाजन म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे हे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. विरोधात असताना यात्रा काढल्या आणि सत्तेत असताना प्रथमच यात्रा काढणारे हे पहिले सरकार आहे. पूढे बोलताना महाजन यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस हे व्हेंटिलेटरवरच्या अवस्थेच्या बाहेर गेले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यांनी यात्रेसाठी संभाजी महाराजांची भूमिका करणार्‍या अभिनेत्यालाच आणले आहे, असे महाजन म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या जळगावमध्ये आयोजित दुसऱ्या टप्प्यात पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार सूरजितसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, महापौर सीमा भोळे, ललित कोल्हे आदी उपस्थित होते.

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here