महाराष्ट्र शासन दिल्ली दरम्यानची रेल्वे व विमानसेवा बंद करण्याच्या विचारात

कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हे पाऊल योजण्याचे विचारार्थ असले, तरी याविषयी अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना विषाणू बाधित प्रकरणांची अचानक मोठ्याने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र शासन दिल्ली व महाराष्ट्र यांदरम्यानची रेल्वे व विमानसेवा स्थगित करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यात ‘कोव्हिड-१९’च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीच्या उपायांपैकी हे एक पाऊल असल्याचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी पिटीआय वृत्तसंस्थेला सांगितले, “राज्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना विचारत घेतल्या जात आहे. त्यांपैकी दिल्लीदरम्यानची रेल्वे व विमान सेवा स्थगित करणे हा एक पर्याय आहे.”

कोरोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हे पाऊल योजण्याचे विचारार्थ असले, तरी याविषयी अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचेही कुमार यांनी सांगितले आहे.

एक वृत्तानुसार, मुंबईत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज्यात कोरोना विषाणूच्या प्रभाव रोखण्यासाठी ज्या राज्यांत प्रकरणांची वाढ होते आहे, अशा ठिकाणांच्या लोकांना राज्यात प्रवेशास प्रतिबंध लावणे हा एक उपाय आहे, अशी चर्चा झाली आहे.

वाचा | कोव्हिड-१९ लसींविषयीची चुकीची माहिती व कटकारस्थाने सिद्धांत लसींनाच ठरताहेत मारक

दिल्लीत अचानक कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या मोठ्याने वाढली आहे. २८ ऑक्टोबरला दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात ५,००० ‘कोव्हिड-१९चे रुग्ण आढळले. तर ११ नोव्हेंबरला आठ हजारांच्या वर रुग्ण आढळले. काल देशाच्या राजधानीत नव्याने आढळलेल्या ६,६०८ कोव्हिड-१९ प्रकरणांसह दिल्लीतील कोरोना विषाणू बधितांची एकूण संख्या ५.१७ लाखांच्या वर गेली आहे. तसेच, काल दिल्लीत ११८ मृत्यूंची नोंद झाली, त्यामुळे दिल्लीतील एकूण मृतकांची संख्या ८,१५९ इतकी झाली आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात काल ५,६४० कोरोना बधितांचीनोंद झाली असून, एकूण आकडा १७.७ लाखांवर पोहचला आहे. तर आजपर्यंत राज्यात ४६,५११ कोरोना बाधित रुग्ण दगावले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: