२५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; याविषयी व्यवस्थित समजून घ्या!

ब्रेनवृत्त । मुंबई


गेल्या काही आठवड्यांपासून कोव्हिड-१९ चे संसर्ग दर कमी असणाऱ्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यानुसार या जिल्ह्यांमध्ये जवळपास सर्वच घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. दुकाने, सभागृहे, चित्रपटगृहे व व्यायामशाळांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत, तर लग्नसमारंभात उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवरील मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.

संग्रहीत छायाचित्र

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या निर्बंधांविषयी काल माहिती दिली. त्यावेळी बोलताना मंत्री असेही म्हणाले, “लग्न समारंभांसाठी वातानुकूलित सभागृहांचा वापर करणाऱ्या लोक कदाचित आमच्या या निर्णयामुळे निराश होतील.” पण, सद्यस्थितीत  लग्न कार्यक्रमांमध्ये किती लोक उपस्थित असावेत याची मर्यादित संख्या त्यांनी कायम ठेवली आहे.

वाचा प्राणवायू तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही!

> शासनाने शिथिल केलेले निर्बंध व्यवस्थित समजून घ्या : 

  • राज्यातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये  नागपूर, नाशिक, ठाणे आणि मुंबचा समावेश आहे.
  • उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, बीड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, रत्नागिरी व पालघर- निर्बंध कायम राहतील. 
  • हॉटेल्स आणि दुकानांची वेळ रात्री ९ पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि ते ५०% क्षमतेने सुरु असतील. पण यासाठी कर्मचाऱ्यांचे कोव्हिड-१९ लसीकरण पूर्ण झालेले असावे.
  • शनिवारी मर्यादित निर्बंध असतील, तर रविवारी आधीपासून सुरु असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
  • शनिवार व रविवारच्या निर्बंधांसंबंधीच्या सुधारित मार्गदर्शिका येत्या २-३ दिवसांत जाहीर करण्यात येतील.
  • लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांना येत्या २ ते ३ दिवसांत उपनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याचे संकेतही शासनाने दिले आहेत. 
  • दुकाने, सभागृहे, चित्रपटगृहे व व्यायामशाळांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.
  • तर लग्नसमारंभात उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवरील मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. 

हेही वाचा । जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!

निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्याआधी काल (गुरुवारी) राजेश टोपे म्हणाले होते, की निर्बंध शिथिल करण्याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोव्हिड कृती दलाच्या बैठकीत घेतील. “राज्यातील कोरोना संसर्गाच्या सरासरी दरापेक्षा कमी संक्रमण दर असणाऱ्या जवळपास २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याची शिफारस आम्ही मुख्यमंत्र्याना केली आहे”, असे टोपे म्हणाले होते.

> राज्यातील कोव्हिड-१९ ची सद्यस्थिती

राज्यात काल (२९ जुलै) ७,२४२ कोरोना बाधितांची रुग्णांची नोंद झाली, ११,१२४ रुग्ण बरे  झाले. राज्यात सद्या ७८,५६२ सक्रिय प्रकरणे आहेत.  राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५९ टक्क्यांवर पोहचला आहे, तर मृत्युदर अद्याप २.०२% वर कायम आहे. 

 


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: