१२वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या लागणार निकाल!

ब्रेनवृत्त | मुंबई


“सर्वांचे निकाल लागले, मग आमचे निकाल कधी लागणार” असा विचार करत बसणाऱ्या राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. उद्या दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा अंतिम निकाल लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेे जाहीर केले आहे. 

प्रातिनिधिक छायाचित्र

कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यातील बारावीच्या राज्य मंडळाची परीक्षा (बोर्डाची) रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बारावीच्या अंतिम निकाल तयार करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ठरलेल्या मूल्यांकन प्रणाली आधार राज्याने घेतला. त्यानुसार, दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत मूल्यांकनातील गुणांवर आधारित पध्दतीनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या काळी, बारावीची ९९ टक्क्यांवर उडी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उद्या (मंगळवार) दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 

 

अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण, तसेच इयत्ता १२ वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण यानुसार हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा :writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: