‘आयुष्मान भारत’ अंतर्गत देशात सर्वाधिक आरोग्य केंद्र महाराष्ट्रात

महाराष्ट्रात असणाऱ्या 6381 आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये 4117 सहायक आरोग्य केंद्र आहेत. ही दुर्गम तसेच ग्रामीण पातळीवर कार्यरत आहेत असून, 1825 प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Centres) ही निमशहरी भागात कार्यरत आहेत.

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ पोहोचावा यासाठी केंद्र शासनाद्वारे २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजने अंतर्गत देशभरात 50 हजाराहून अधिक ‘आयुष्मान भारत आरोग्य व कल्याण केंद्र’ (HWC : Health & Wellness Centre) कार्यरत असून, यांमध्ये सर्वाधिक 6381 केंद्र महाराष्ट्रात आहेत.

महाराष्ट्रात असणाऱ्या 6381 आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये 4117 सहायक आरोग्य केंद्र आहेत. ही दुर्गम तसेच ग्रामीण पातळीवर कार्यरत आहेत असून, 1825 प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Centres) ही निमशहरी भागात कार्यरत आहेत. सोबतच, 439 प्राथमिक आरोग्य केंद्रे शहरी भागांत असून, ही महानगरपालिका असणाऱ्या भागात कार्यरत आहेत. ही आरोग्य केंद्रे आरोग्य विभागाचा कणा असून या केंद्राच्या माध्यमातून राज्यात नियमित प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते.

हेही वाचा | आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘आरोग्यसेवा पुरवठा साखळी पोर्टल’सुरू  

आरोग्य आणि कल्याण केंद्रांचेे

आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या माध्यमातून लोकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान केली जाते. याअंतर्गत माता, नवजात अर्भके, पौगंडावस्थेतील पोषण, संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण यासाठी ही केंद्र कार्यरत आहेत. यासोबतच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ‘ई-संजीवनी‘ (e-Sanjeevani) संकेतस्थळाच्या अंमलबजावणीचेही काम एचडब्ल्यूसी पाहते. यामध्ये रूग्ण-ते-डॉक्टर, ओपीडीची सेवा, डॉक्टर-ते डॉक्टर टेलिकन्सलटेशनची सेवाही पुरवण्यात येते.

आरोग्य व कल्याण केंद्रांचे अभिनंदन करताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्षवर्धन म्हणाले, “कोव्हिड-१९ महासाथीच्या काळात एचडब्ल्यूसीने महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. गाव पातळीपर्यंतचे आरोग्य विभागाचे नियोजन, देखरेख, प्रक्रियेची साखळी यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे शक्य होऊ शकले.”  सोबतच, या महासाथीच्या परिस्थितीत लाखो लोकांना आवश्यक सेवा दिल्याबद्दल आघाडीचे आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा सेविकांचे विशेष आभार त्यांनी मानले.

वाचा | राज्यात मोफत आरोग्य सल्ल्यासाठी ‘ई-संजीवनी ओपीडी’ सुरू

एचडब्ल्यूसीच्या माध्यमातून संपर्क ट्रेसिंग, समुदायाचे निरीक्षण करणे, रूग्णांची लवकर ओळख पटवणे या सारख्या बाबींमध्ये मदत झाली आहे. यासह नवजात बालके, वृद्ध आणि इतर आजार असणाऱ्या गटांच्या संरक्षणासाठी, आवश्यक त्या आरोग्य सेवा या काळात या केंद्रामार्फत प्रदान करण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील जवळपास १ कोटी २९ लाख लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना १५ हजार ५०० कोटींचे मोफत उपचार दिले गेले आहेेेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: