सायबर गुन्ह्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका वाटप करण्याचे आदेश

विविध मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयीची माहितीपुस्तिका वितरित करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. महितीपुस्तिक गृह मंत्रालयातर्फे तयार करण्यात आली आहे.

 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, ६ डिसेंबर

सायबर सुरक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालायलाने विविध मंत्रालयांना त्यांद्वारे चालवल्या शाळांमध्ये माहितीपुस्तिका वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. ह्या महितीपुस्तिकेतून संभावित सायबर हल्ल्यांची माहिती आणि त्यासंबंधीचे सुरक्षात्मक उपाय यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

गृह मंत्रालयाद्वारे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करण्यासाठी माहितीपुस्तिका तयार केली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

वाढते सायबर गुन्हे आणि त्यांमुळे नागरिकांच्या जीवाला व खाजगीपणाला असलेला धोका ही गंभीर बाब आहे. या सायबर गुन्ह्यांना वयाची अट नसतेच. अशावेळी शाळकरी मुलांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दलची जागरूकता असणे गरजेचे आहे. यासंबंधी शाळकरी मुलामुलींमध्ये जनजागृती करण्याचे नवे पाऊल शासनातर्फे उचलण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने रेल्वे मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयांना त्यांच्या अखत्यारीत चालवणाऱ्या शाळांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयीची माहितीपुस्तिका मुलांना वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांसाठी एक महितीपुस्तिक तयार करण्यात आली आहे. ज्यांना सायबर हल्ल्यांचा संभावित धोका असतो, ज्यांना संगणक आणि सायबर जगाविषयी थोडीफार माहिती असते आणि जे सायबर सुरक्षेबद्दल समजू शकतात, अशा १३ वर्षांपेक्षा वरील वयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे महितीपुस्तिक तयार करण्यात आले आहे. सायबर हल्ल्यांविषयी विद्यार्थ्यांना साधारण माहिती देणे, विविध सायबर धोक्यांविषयी त्यांना अवगत करणे, त्यांचे परिणाम आणि संरक्षणात्मक उपाय विद्यार्थ्यांना सांगणे, हे या महितीपुस्तिकेचे मुख्य उद्देश आहे.

कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवणाऱ्या व तसेच लोकांचा जीव जाण्यास कारणीभूत असलेल्या विविध ‘अफवा’ किंवा ‘खोटी माहिती’ (फेक न्यूज) यांविषयी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कामही या महितीपुस्तिकेतून केले जाणार आहे.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: