सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत बसण्यासाठी ७५% हजेरी बंधनकारक
सीबीएसईच्या इयत्ता दहावी व बारावीमधील ज्या विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षात वर्गातील उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी अधिसूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काढली आहे.
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसंबंधी महत्त्वाची अधिसूचना काल जारी केली आहे. सीबीएसई शाळेतील ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी असेल, अशांना बोर्डाच्या परीक्षेत बसण्याची परवानगी देऊ नये, असा आदेश या मंडळाने सर्व शाळांना दिला आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऐन दीड महिन्यावर असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अचानक एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी सीबीएसईने जारी केलेल्या सूचनापत्रकानुसार, यावर्षी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्व शाळांनी मंडळाला द्यायची आहे. तसेच, सीबीएसई शाळेतील ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची परवानगी देऊ नये, असा आदेशही शाळांना देण्यात आला आहे.
राज्यातील ३ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार
● उपस्थिती कमी असेल, तर प्रवेशपत्र नाही
ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यांनाच दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) देण्यात येणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांची उपस्थित 75 टक्के नाही अशा विद्यार्थ्यांना परिक्षेचे हॉल तिकीट मिळणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.
#Students should have a minimum 75 per cent attendance to be able to appear for the 10th and 12th examinations to be conducted by the Central Board of Secondary Education (#CBSE).
Photo: IANS pic.twitter.com/vR6DyTLK56
— IANS Tweets (@ians_india) January 2, 2020
हेही वाचा : शिक्षणाची दैनावस्था : भाग १
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी असेल अशा विद्यार्थ्यांना गैरहजर राहिल्याचे पुरावे देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, यासाठी खूपच कमी वेळमर्यादा देण्यात आली आहे. त्याआधी, ७५% पेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित शाळांद्वारे विभागीय कार्यालयाकडे देण्यात येईल. या यादीवर 7 जानेवारी रोजी अंतिम निर्णय होणार आहे. 7 जानेवारीच्या आत विद्यार्थ्यांकडून विभागीय कार्यलयामध्ये खुलासा आला नाही, तर त्यांना सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस बसता येणार नाही, असे मंडळाने आदेेेशात म्हटले आहे.
यंदा सीबीएसईची दहावीची परीक्षा 26 फेब्रुवारी 2020 पासून सुरु होऊन, 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. तर, बारावीची परीक्षा 22 फेब्रुवारीपासून 30 मार्चपर्यंत असेल.
◆◆◆