मॉडर्नाच्या लसीची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात
मॉडर्ना इंकॉर्पोरेटेडने कालपासून कंपनीद्वारे निर्मित लसीच्या चाचणीचा अंतिम टप्पा सुरू केला आहे. या शेवटच्या टप्प्यात ३० हजार लोकांवर या लसीची चाचणी केेली जाणार आहे.
वृत्तसंस्था | वाशिंग्टन
कोरोना विषाणूच्या विरोधात प्रभावी लस निर्माण केल्याचा दावा करून असलेल्या मॉडर्ना इंकॉर्पोरेटेडने कालपासून कंपनीद्वारे निर्मित लसीच्या चाचणीचा अंतिम टप्पा सुरू केला आहे. या शेवटच्या टप्प्यात ३० हजार लोकांवर या लसीची चाचणी केेली जाणार आहे. जर या चाचणीचे निष्कर्ष लवकरात लवकर आले, तर डिसेंबरपर्यंत ही लस बाजारात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मॉडर्नाद्वारे सांगण्यात आले आहे.
कालपासून सुरु झालेल्या तिसऱ्या टप्प्यात 30 हजार लोकांना ही लस दिली जाणार असून, अमेरिकेतल्या 89 ठिकाणी ही चाचणी होणार आहे. या शेवटच्या टप्प्याचे निष्कर्ष नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला अपेक्षित आहेत, अशी माहिती साथीच्या रोग विभागाचे प्रमुख डॉ. फाऊची यांनी दिली आहे. सोबतच, मॉडर्ना (Moderna) आणि फायझर (Pfizer) या दोन्ही फार्मा कंपन्यांनी या लशीचे कोट्यवधी डोस तयार करायला सुरुवात केली आहे.
ब्रेनविश्लेषण | ‘मॉडर्ना’ची ‘कोव्हिड-१९’वरील लस आणि चाचणीचे टप्पे
मॉडर्नाच्या ‘कोव्हिड-१९’वरील लसीच्या या अभ्यासात अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेनेही (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ) सहभाग घेतला आहे. तसेच, अमेरिकी सरकारने या संशोधनासाठी कोट्यवधी डॉलर्सची आर्थिक मदतही देऊ केली आहे. वर्षअखेरीस सुमारेे 50 कोटी डोस तयार असतील, असे मॉडर्नातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या लशीचा फायदा सर्वात आधी अमेरिकेला होणार असला, तरी 2021 च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात ही लस सर्वत्र बाजारात उपलब्ध असू शकेल.
वाचा | भारतीय बनावटीच्या दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरू
ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे विकसित लसीच्या चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वी मॉडर्नाने तिच्या लशीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष जाहीर केले होते. त्याचवेळी चाचणीचा तिसरा टप्पा सुरु करण्याची तारीख 27 जुलै ठरवण्यात आली होती. दुसरीकडे, ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे.
प्रतिजन आणि प्रतिपिंड चाचणी म्हणजे नक्की काय ?
भारतातही स्वदेशी बनावटीच्या दोन लसींना मानवी चाचणी करण्यास भारतीय औष महानियंत्रकातर्फे (DCGI) परवानगी देण्यात आली आहे. आयसीएमआरच्या मदतीने निर्माण करण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन‘ची मानवी चाचणी सुरू झाली असून, पहिला डोस ३० वर्षीय स्वयंसेवकाला देण्यात आला आहे.