जनगणनेसाठी सुट्ट्या रद्द करण्याच्या निर्णयास शिक्षक परिषदेचा नकार!
ब्रेनवृत्त, मुंबई
आगामी ‘भारतीय जनगणना, २०२१‘ साठी देशातील, तसेच शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मे महिन्यातील सुट्ट्यांना मुकावे लागणार आहे. यामुळे राज्यातील हजारों शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या जनगणना अधिकारी यांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांना जनगणनेच्या कामासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात येणार असल्याचे पत्र दिले आहे. यामुळे शिक्षकांत आक्रोश निर्माण झाला असून महाराष्ट्र शिक्षक परिषदेने हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी विनंती जनगणना अधिकाऱ्यांना केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
देशाच्या जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या रद्द करण्याचे शासनाने ठरवले आहे. २०२१ च्या जनगणनेचा पहिला टप्पा १ मे पासून सुरू होणार असून यासाठी शिक्षकांना कामी लावण्यात येईल. या पहिल्या टप्प्यात घरांना क्रमांक देणे, गट विभागणी, घरयादी तयार करणे, या कामांचा समावेश असणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असून, त्यासाठी उन्हाळ्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वर्षाच्या एकूण ७६ पैकी जवळपास ४० सुट्ट्या रद्द करण्यात येतील.
एनपीआर, एनआरसी आणि बरंच काही !
जनगणनेसाठीचा हा निर्णय शिक्षकांवर अतिरिक्त भार वढवणारा असून, हे काम इतर कर्मचाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. दरम्यान, या काळात दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे कामही शिक्षकांकडे असणार आहे. त्यात जनगणेच्या कामामुळे शिक्षकांवर अतिरिक्त भार येईल, असे परिषदेने म्हटले आहे.
२०२१ ची जनगणना होणार पूर्णतः डिजिटल
एका मराठी वृत्तवाहिनीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जनगणनेसाठी शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, अशी असे परिषदेचे मुंबईतील कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी म्हटले आहे. सोबतच, जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या कालावधीत महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडण्याची परवानगी देऊ नये, अशा सुचना जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.
◆◆◆