नासा व स्पेसएक्सचे मानवी अभियान सुरु; फाल्कन-९ चौघांना घेऊन निघाले आयएसएसकडे

नासाच्या प्रथम स्पेसएक्स अंतराळवीर रवानगी अभियानाची सुरुवात म्हणून स्पेएक्सच्या मालकीचे फाल्कन-९ अंतराळयान ४ अंतराळवीरांच्या पहिल्या दलाला घेऊन (Crew-1) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. सोबतच, सुमारे ४४० पाउंडपेक्षा जास्त वजनाचे वैज्ञानिक उपकरणे व इतर साहित्यही या यानातून प्रक्षेपित करण्यात आले.

 

ब्रेनवृत्त | केप कॅनव्हरल

अमेरिकेची राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळ संस्था (NASA) व खासगी अंतराळ संस्था ‘स्पेसएक्स’ (SpaceX) यांनी आज संयुक्तपणे ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’वर (ISS : International Space Station) अंतराळवीर पाठवण्याच्या त्यांच्या पहिल्या परिचालन वाणिज्यिक चालक दल अभियानाला (Opetational Commercial Crew-1 Mission) नासाच्या फ्लोरिडास्थित केनेडी अंतराळ केंद्रावरून सुरुवात केली.

नासा व स्पेसएक्सच्या पहिल्या परिचालन वाणिज्यिक चालक दल अभियानाला फ्लोरिडास्थित केनेडी अंतराळ केंद्रावरून सुरुवात झाली.

नासाच्या प्रथम स्पेसएक्स अंतराळवीर रवानगी अभियानाची सुरुवात म्हणून स्पेएक्सच्या मालकीचे फाल्कन-९ अंतराळयान ४ अंतराळवीरांच्या पहिल्या दलाला घेऊन (Crew-1) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. सोबतच, सुमारे ४४० पाउंडपेक्षा जास्त वजनाचे वैज्ञानिक उपकरणे व इतर साहित्यही या यानातून प्रक्षेपित करण्यात आले.

हेही वाचा | चंद्राच्या सुर्यप्रकाशित भागावरही पाणी ; नासाने दिली चंद्रावर भरपूर पाणी असल्याची खात्री

आयएसएसवर पाठवण्यात आलेल्या चार अंतराळवीरांमध्ये तीन अमेरिकी व एक जपानी अंतराळवीरांचा समावेश आहे. नासासाठी एखाद्या खासगी संस्थेने अंतराळात मानवाला पाठवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. ‘कोव्हिड-१९’चा जगव्यापी प्रादुर्भाव बघता होत चाललेले वेगवेगळे प्रयत्न यांचा संदर्भ घेऊन, या यानाच्या कॅप्सूलला ‘स्थितिस्थापकत्व‘ वा ‘लवचिकता’ (Resilience) असे नाव देण्यात आले आहे.

नासाच्या स्पेसएक्स मानवी अभियानांतर्गत चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले.

अंतराळवीरात पाठविण्यात येणाऱ्या या दलात शक्य तितके विविधांगी क्षेत्रातील अंतरळवीरांचा समावेश आहे. यामध्ये भौतिकीशास्त्रज्ञ असलेले नौदल कमांडर शनॉन वॉकर (Shannon Walker), दीर्घ काळासाठी अंतराळ अभियानात सहभागी होणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर व्हिक्टर ग्लोवर (Victor Glover) आणि जवळपास मागील ४० वर्षांमध्ये तिन्ही प्रकारच्या अंतराळ यानांतून भरारी घेणारी पहिली व्यक्ती असा मान असलेल्या जपानच्या सोईची नोगुची (Soichi Noguchi) यांचा समावेश आहे.

तीन पुरुष व एक स्त्री अंतराळवीर असा समावेश असलेल्या या चौघांच्या दलाचे नेतृत्व करणाऱ्या हवाई दलाच्या मार्शल असलेल्या कमांडर माईक हॉपकिन्स यांनी, “क्रिव्ह कॅप्सूलचे ‘Resilience’ असे नाव फक्त कोरोना साथारोगाच्या संदर्भातूनच नव्हे, तर यास वर्तमानातील वांशिक अन्याय व वादग्रस्त राजकारण यांचाही संदर्भ आहे.”

वाचा | ‘स्पेसएक्स फाल्कन-९’ ठरले नव्या इतिहासाचे साक्षी !

काही महिन्यांपूर्वी दोन प्रायोगिक चाचणींनंतर आज आपल्या संयुक्त अभियानाचा पहिला टप्पा या संस्थानी पार पाडला. मे महिन्याच्या शेवटी नासाने ‘स्पेसएक्स’ या खासगी कंपनीच्या मदतीने आज जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून ‘नासा स्पेसएक्स डेमो-२’ अभियानाला सुरुवात केली होती. यावेळी नासाच्या डग हर्ले (Doug Hurley) आणि बॉब बेहनकें (Bob Behnken) या दोन अंतराळवीरांना घेऊन ‘फाल्कन-९’ने अंतराळात ऐतिहासिक झेप घेतली होती.

 

(संपादन, भाषांतरण व मुद्रितशोधन – मराठी ब्रेन)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: