केजरीवाल यांचा शासनाला सावधतेचा इशारा : सिंगापूरमधील विषाणूमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता

सिंगापूरमध्ये कोव्हिड-१९ विषाणूचा नवा प्रकार (Variant)  आढळला असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या विषाणूबाबत केंद्र शासनाला सावध होण्याचा इशारा दिला आहे. भारतातील कोरोना विषाणू आजाराच्या तिसऱ्या लाटेसाठी हा प्रकार कारणीभूत असू शकतो, त्यामुळे शासनाने आतापासूनच त्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

Read more

कोव्हिड-१९मुळे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांचे निधन!

भारतीय वैद्यकीय संघटनेचे (IMA : Indian Medical Association) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे काल रात्री उशिरा कोव्हिड-१९ मुळे निधन झाले. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे शारीरिक परिस्थिती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये संवातकावर (Ventilator) ठेवण्यात आले होते. काल रात्री सुमारे ११.३० वाजता अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालयाच्या अधिकृत निवेदनातून जाहीर झाले आहे. 

Read more

डीआरडीओची २-डिजी औषध देशाला समर्पित!

डीआरडीओच्या आण्विक औषधे व संलग्न विज्ञान संस्था (INMAS) व हैदराबादमधील डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे २-डिजी (2-deoxy-D-glucose) औषध विकसित केले

Read more

कोव्हीशिल्डच्या दुसऱ्या मात्रेची आगाऊ नोंदणी वैध

कोव्हीशील्डच्या (Covishiled) दुसऱ्या मात्रेसाठीची आगाऊ ऑनलाईन नोंदणी वैध राहणार असून, ती कोव्हीन (CoWIN) व्यासपीठावरून रद्द केली जाणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल(रविवारी) सांगितले. कोव्हीन प्रणालीत काही आवश्यक बदल करण्यात आले असून, जर पहिल्या मात्रेनंतरचा कालावधी ८४ दिवसांहून कमी असेल, तर लसीची दुसरी टूक घेण्यासाठी कोव्हीनवर नोंदणी करता येणार नाही. 

Read more

गंगेत शव फेकण्यावर प्रतिबंध आणा : शासनाचे राज्यांना आदेश

गंगा नदीत शव फेकण्यावर प्रतिबंध आणण्यास आणि त्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे, तसेच त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करण्याचे आदेश संघशासनाने राज्यांना दिले आहेत. मृतकांचे शव अथवा अर्धवट जळालेले प्रेत गंगा आणि तिच्या सहाय्यक नद्यांमध्ये फेकून देणे सर्वात अनिष्ट आणि भयानक कृत्य असल्याचे शासनाने म्हटले आहे.

Read more

तृतीयपंथी समुदायासाठी विशेष लसीकरण राबवणारे आसाम पहिले राज्य

कोव्हिड -१९ लसीकरणांतर्गत तृतीयपंथी समुदायातील लोकांसाठी आसाम राज्यात स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवली जात आहे. असे करणारे आसाम हे देशातील पहिलेच राज्य आहे. या विशेष मोहिमेचा भाग म्हणून काल (शुक्रवारी) गुवाहाटीमध्ये तृतीयपंथी समुदायाच्या तीस सदस्यांना लस देण्यात  आली.

Read more

पीएम-किसान योजनेच्या आठव्या हप्त्यात १९,००० कोटी रुपये जाहीर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक लाभाचा आठवा हप्ता काल (शुक्रवारी) दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जाहीर केला. या हप्त्यांतर्गत 9.5 कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात तब्बल १९ ,000 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत एका हप्त्यात देण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे.

Read more

“राज्यांच्या अधिक लस मागणीमुळे शासनाच्या पुढाकाराचे नुकसान होते”

“राज्यांकडून होणाऱ्या अधिक लसींच्या मागणीमुळे सर्वसामान्यांमध्ये संकुचित राजकीय प्रवृत्तीची निर्मिती होते आणि यामुळे केंद्र शासनाच्या कोव्हिड-१९ची परिस्थिती हातळण्याच्या संपूर्ण पुढाकाराचे नुकसान होते”, असे देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन काल (गुरुवारी) म्हणाले.

Read more

पुढील आठवड्यात स्फुटनिक बाजारात येणार, येणार गं!

रशियामध्ये उत्पादित कोरोना विषाणूवरील स्पुटनिक V (Sputnik V) ही लस पुढील आठवड्यापासून भारतात वापरासाठी उपलब्ध होणार असल्याचे संघ शासनाने जाहीर केले आहे. तसेच, जुलै महिन्यापासून या लसीचे स्थानिक उत्पादन सुरु होणार असल्याचेही शासनाने म्हटले आहे. 

Read more

आता ४ महिन्यांनंतरही घेता येईल कोव्हिशिल्डची दुसरी गुटी !

कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या दोन मात्रांतील कालावधी १२ ते १६ आठवड्यांसाठी वाढवण्याच्या कोव्हिड कृती गटाच्या (COVID Working Group) शिफारशी स्वीकारण्यात आल्याचे केंद्र शासनाने आज म्हटले आहे. त्यामुळे आता या लसीचा दुसरा डोस जवळपास चार महिन्यांच्या नंतरही घेता येणार आहे. 

Read more