७० टक्के पाकिस्तानींना इंटरनेटच माहीत नाही!
पाकिस्तानच्या 15 ते 65 वर्षे वयोगटातील सुमारे 70 टक्के लोकांना अजूनही इंटरनेट काय असते हे माहीत नसल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तसंस्था,
इस्लामाबाद, १३ नोव्हेंबर
पाकिस्तानमधील 15 ते 65 वर्षे वयोगटातील सुमारे 70 टक्के लोकांना अजूनही इंटरनेट काय असते, हे माहीत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. माहिती-संचार-तंत्रज्ञान (आयसीटी)च्या एका सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तपत्र डॉनने श्रीलंकेच्या थिंक टँक ‘लिर्नएशिया’ (LIRNEasia) कडून करण्यात आलेल्या आयसीटी सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये पाकिस्तानमधील 2 हजार कुटुंबीयांकडून आंतरजाल (इंटरनेट) बद्दलची सामान्य माहिती जाणून घेण्यात आली आहे. या सर्वेक्षणात 15 वर्षांपासून ते 65 वर्षांच्या वयापर्यंतच्या लोकांचा समावेश आहे.
Almost 70% Pakistanis don't know what internet is, reveals surveyhttps://t.co/4Khgbjt0hk
— Gadgets Now (@gadgetsnow) November 12, 2018
हेही वाचा : देशातील सर्वात जास्त डेटा केंद्र मुंबईत
६३% भारतीय इंटरनेटवर करतात फिरण्याचे नियोजन; ‘कायक’चे सर्वेक्षण!
● सर्वेक्षण अहवालाबाबत ठळक मुद्दे:
१. 15 ते 65 वर्ष वय असलेल्या लोकसंखेमध्ये फक्त 30 टक्के लोकांना इंटरनेट संदर्भात माहिती आहे.
२. हा सर्वेक्षण ऑक्टोबर, २०१७ पासून डिसेंबर, २०१७ पर्यंत करण्यात आला होता.
३. या सर्वेक्षणातून विविध देशांतील किती इंटरनेट वापरकर्ते माहिती-संचार-तंत्रज्ञान सुविधांचा वापर करतात ते पहायचे होते.
४. डॉनने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी (पीटीए)च्या वेबसाइटवर 152 मिलियन सक्रिय सेल्युलर सब्सक्रायबर असल्याचे प्रकाशित करण्यात आले आहे.
५. सर्वेक्षणानुसार, पुरुषांच्या तुलनेत पाकिस्ताच्या महिला इंटरनेटचा 43 टक्के कमी वापर करतात. तर भारतात व बांगलादेशमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 57 टक्के व 62 टक्के इतके आहे.
◆◆◆
जगभरातील विविध बातम्यांसाठी आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी भेट द्या www.marathibran.com ला.
तुमचे लिखाण पाठवा : writeto@marathibran.com वर.