आता आधारसाठी ओळखपत्रांची गरज नाही !

आधार बनविण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक अशा कागदपत्रांमध्ये प्राधिकरणाने नागरिकांना सूट दिली आहे. त्यामुळे आता आधार ओळखपत्र बनविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नसली, तरी आधार ओळखपत्र बनवता येणार आहे.

 

ब्रेनवृत्त, ९ जुलै

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकारणाने (UIDAI : Unique Identification Authority of India) नवे आधार कार्ड बनविण्याच्या प्रक्रियेसंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधार बनविण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक अशा कागदपत्रांमध्ये प्राधिकरणाने नागरिकांना सूट दिली आहे. त्यामुळे आता आधार ओळखपत्र बनविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नसली, तरी आधार ओळखपत्र बनवता येणार आहे.

आधार ओळखपत्र हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. हे केवळ कागदपत्र नसून एक ओळखपत्र आहे. कोणताही आर्थिक व्यवहार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार असणे आवश्यक आहे.

● कोणत्याही कागदपत्रांशिवाय आधार बनविण्याची प्रक्रिया

आधार ओळखपत्राशिवाय अनेक वेळा आवश्यक कामांत अडथळे येतात किंवा ती कामे होत नाहीत. आतापर्यंत आधार कार्ड बनविण्यासाठी इतर ओळखपत्र आणि राहण्याचे ठिकाण यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता होती. पण आता या कागदपत्रांशिवाय आधार कार्ड बनवता येईल. त्यामुळे आता आधार केंद्रावर तुम्ही मदतनिसाची (Introducer) मदत घेऊ शकता.

‘इंट्रोड्यूसर’ एक अशी व्यक्ती आहे जी रजिस्ट्रारद्वारे अधिकृतपणे ओळखीचा पुरावा (Proof of Identity) किंवा अधिकारपत्र नसलेल्या रहिवाशांना सत्यापित करण्यासाठी अधिकृत केली जाते. यासाठी परिचयकर्त्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, तसेच अर्जदारासह नोंदणी केंद्रात हजर असणे आवश्यक आहे.

ब्रेनबिट्स : ‘मास्क्ड आधार’ म्हणजे काय?

परिचयकर्त्याने अर्जदाराची ओळख आणि पत्त्याची पुष्टी करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी नावनोंदणी अर्जावर स्वाक्षरी करावी. त्यानंतर ‘यूआयडीएआय’ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार अर्जदारास अर्जदाराच्या नावे प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्याची वैधता तीन महिन्यांची आहे.

हेही वाचा : ‘आधार’ असल्यास त्वरित मिळेल ‘पॅन’ !

● याव्यतिरिक्तही बनवू शकता आधार कार्ड

याखेरीज, आपले नाव शिधापत्रिकेसारख्या (रेशनकार्ड) कोणत्याही कौटुंबिक दस्तऐवजात असल्यास, पण अद्याप ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा नसल्यासही आपण आधार कार्ड मिळविण्यासाठी अर्ज करू शकता. मात्र अशाप्रकारे आधार बनवायचा असेल, तर सर्वप्रथम कुटुंबप्रमुखाचे आधारकार्ड ओळखीचा पुरावा (पीओआय) किंवा अधिकारपत्र माध्यमातून बनविले असणे गरजेचे आहे. यानंतर, कुटुंबप्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांचा परिचयकर्ता होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: