Site icon MarathiBrain.in

भारतरत्न म्हणजे सवर्ण-ब्राह्मणांचा क्लब : ओवेसी

भारतरत्न पुरस्कार म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब नसल्याचे विधान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना ते बोलत होते.

 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी

‘भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब आहे’, असे असे विधान एमआयएमचे अध्यक्ष व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारवर निशाणा साधत त्यांनी हे विधान केले.

संग्रहित छायाचित्र

एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतरत्न पुरस्कार हा सवर्ण ब्राह्मणांचा क्लब असल्याचे विधान त्यांनी केले आहे. संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. त्यानंतर धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला, त्यावेळी ओवेसींनी मोदी शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारावर टीका केली. “भारतरत्न हा तर ब्राह्मण आणि सवर्णांचा क्लब आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही”, असे ओवेसी म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारीका यांना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.

मोदींना इतिहास तरी माहीत आहे का? : कपिल सिब्बल

पुढे बोलताना ओवेसींनी चंद्रचूड समितीच्या अहवालाचाही उल्लेख केला. दीन दयाळ उपाध्याय यांच्यावर गंभीर आरोप असतानाही त्यांना भारतरत्न जाहीर झाला. इतिहासवर एक दृष्टीक्षेप टाकल्यास भारतरत्न म्हणजे केवळ सवर्णांचा क्लब असल्याचे लक्षात येत, असे ओवेसी म्हणाले. भारतीय संविधानाशी प्रामाणिक राहण्याचा शपथीलाही मोदींनी दगा दिला असल्याचे ते म्हणाले आहेत. ओवेसी म्हणाले की, “डिसेंबर २०१७ मध्ये तुम्हाला मशिद हवी आहे की मंदिर? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला होता. यामुळे त्यांनी संविधानाचाच अपमान केला आहे, कारण ते कोणत्याही एका धर्माला पाठिंबा देऊ शकत नाही.”TOI

याआधीही ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाईलाजाने भारतरत्न द्यावा लागला आणि सरकारला त्यावेळी लाज वाटली म्हणून सरकारने असं केलं, असा दावाही ओवेसींनी केला आहे. सरकारच्या चुकांमुळे जम्मू-काश्मीरची परिस्थिती अजून गंभीर होत चालली आहे. मोदी दाल तलावाच्या सफरीवर जातात आणि तिथे कुणी नसतानाही हात दाखवत फिरतात, अशी टीका ओवेसी यांनी केली.

 

◆◆◆

Exit mobile version