संसदीय कायदा किंवा न्यायालयीन निकालाविना जन-आंदोलनाने राम मंदिर उभारले गेले तर देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असे रामदेवबाबा म्हणाले.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर
राम मंदिर प्रकरणावर तोडगा काढण्यात सर्वोच्च न्यायालयाला उशीर होत असल्याने यावर संसदीय कायद्यानुसारच मंदिर बांधणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेवबाबा यांनी दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
गेल्या काही महिन्यांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरण देशात खूपच चर्चेत आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही यावर प्रतिक्रिया देण्यास देशातील विविध कार्यक्षेत्रातील लोक मागे नाहीत. काल योगगुरू रामदेवबाबा यांनीही राम मंदिरविषयी आपले मत व्यक्त केले. “राम मंदिर संबंधीच्या प्रकरणावर तोडगा काढण्यास सर्वोच्च न्यायालयाला उशीर होत आहे. यावर न्यायालयाकडून कोणताही मार्ग दिसत नाही. त्यासाठी आता एकच पर्याय उरला आहे, तो म्हणजे राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा व्हावा. तरच राम मंदिर उभारणे शक्य होईल”, असे रामदेवबाबांनी म्हटले आहे.
SC se vilamb ho raha hai. Vahan se koi marg nahi dikhta. Ek vikalp bachta hai, sansad mein kanoon bana kar mandir banaye. Prakriya vaidhanik hai. Bina sansad mein kanoon banaye ya SC ke aadesh bina janandolan se mandir bana to kanoon-vyavastha bigadne ki sambhavna hai:Baba Ramdev pic.twitter.com/qSn87AN6NR
— ANI (@ANI) November 15, 2018
पुढे रामदेव बाबा असेही म्हणाले की, राम मंदिर बनवण्याची प्रक्रिया वैधानिक असून, त्याविषयी संसदेत कायदा व्हायला हवा. जर संसदेत कायदाही तयार होत नसेल आणि दुसरीकडे सर्वोच न्यायालयाने आदेशही दिला नसेल, मात्र तरीही जन-आंदोलनाने राम मंदिर उभारण्यात आले तर देशात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी संसदेने कायदा करणे गरजेचे आहे.’