औरंगाबाद नाव खोडून संभाजीनगर लिहिणाऱ्यांना होणार अटक

औरंगाबाद रेल्वेस्थानकवरील फलकावर ‘औरंगाबाद’ हे नाव खोडून ‘संभाजीनगर’ लिहिणाऱ्यांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी व रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. 

 

वृत्तसंस्था, एएनआय

१ जुलै २०१९

औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील फलकावर असलेले औरंगाबाद नाव खोडून त्याऐवजी संभाजीनगर लिहिण्याचे प्रकरण काल औरंगाबाद रेल्वेस्थानकावर घडले. संबंधित कृत्य करणाऱ्या व्यक्तींना अटक करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच पोलीस व रेल्वे प्रशासनातर्फे योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद असे नाव लिहिलेल्या रेल्वे स्थानकावरील फलकावर पेंट फेकून औरंगाबाद हे नाव खोडून संभाजीनगर लिहिणाऱ्यांचा व्हिडिओ बाहेर आला असल्याचे वृत्त आहे. या व्हिडिओमध्ये काही माणसे पेंट फेकून औरंगाबाद हे नाव खोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

संबंधित कृत्य करणाऱ्या युवकांची माहिती अजून उघड झालेली नाही. मात्र, त्यांच्यावर योग्य ती कारवाई प्रशासनाद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: