फिझरची कोव्हिड-१९ लस ९५% प्रभावी; प्रत्यक्ष उपयोगाच्या परवानगीसाठी प्रयत्न सुरू

वृत्तसंस्था | एएफपी

ब्रेनवृत्त | १८ नोव्हेंबर

अंतिम चाचणीतून आढळलेले परिणाम बघता कंपनीद्वारे तयार करण्यात आलेली कोरोना विषाणूवरील लस ९५% प्रभावी, सुरक्षित तसेच दगावण्याची सर्वांत जास्त शक्यता असलेल्या वयोवृद्धांचे संरक्षण करणारी असल्याचे फिझर (Pfizer) या औषधनिर्माण कंपनीने म्हटले आहे. व्यापक आपत्तीमय उद्रेक करून जगाला हादरून टाकलेल्या साथरोगावर आणीबाणीच्या स्थितीत मर्यादित उपाय म्हणून लसीसंबंधीची माहिती महत्त्वाची व आवश्यक आहे.

फिझर व तिची सहकारी जर्मन कंपनी बायोनटेक (BioNTech) यांनी नुकत्याच एका आठवड्यापूर्वी त्यांच्या लसीच्या प्राथमिक चाचणीचे पहिले खात्रीशीर परिणाम जाहीर केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. आता या कंपन्यांची टीम संबंधित लसीच्या आपत्कालीन वापरासाठी संयुक्त राज्यांच्या औषधे नियंत्रकाची औपचारिक परवानगी मिळवण्यात व्यस्त आहे. सोबतच, युरोप, ब्रिटन व कॅनडाच्या नियंत्रकांकडून लसीच्या वापराची परवानगी घेण्याच्या प्रयत्नात आहे.

ब्रेनविश्लेषण | कोव्हिड-१९ लसींविषयीची चुकीची माहिती व कटकारस्थाने सिद्धांत लसींनाच ठरताहेत मारक

सुरुवातीला ४०,००० लोकांवर केलेल्या अभ्यासात ९४ संक्रमित लोकांची नोंद झाल्यानंतर त्यांची ‘कोव्हिड-१९‘वरील लस ९०% प्रभावी असल्याचे फिझर व बायॉनटेकने जाहीर केले होते. मात्र आता नव्या घोषनेनुसार, कंपनीला १७० संक्रमित प्रकरण हाती लागले आहेत. ह्यांपैकी आठ अशा स्वयंसेवकांपैकी आहेत, ज्यांना बनावट डोसऐवजी प्रत्यक्ष लस देण्यात आली आहे. या आठपैकी एकाला अतिशय गंभीरपणे लागण झाली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बायोनटेकचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष व सह-संस्थापक डॉ. ऊगुर साहिन असोसिएट प्रेसला याविषयी सांगताना म्हणतात, “हे अतिशय विलक्षण व मजबूत संरक्षण आहे.”

दरम्यान, कंपनीने संबंधित अभ्यासाची विस्तृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही व स्वतंत्र तज्ज्ञांद्वारे चाचणींचे परिणाम तपासण्यात आलेले नाहीत. तसेच, ही लसीचे संरक्षण किती काळापर्यंत टिकू शकते व याव्यतिरिक्त लोकांना सहाय्यक शक्तिवर्धकांची गरज पडू शकते का? या प्रश्नांची उत्तरेही अजून मिळणे आहे. मात्र, सर्वांची नजर आता संभाव्य लसीच्या प्रगतीकडे आहे, कारण वाढत्या थंडीमुळे लोकांना घरांमध्ये दाटीने राहावे लागणार आहे, जे अमेरिकेत या रोगाच्या संक्रमण दराला परत वाढविण्याच्या शक्यता आहे.

फिझर आणि बायोनटेकने म्हटले आहे की, ६५ वर्षांपुढील वयाच्या लोकांवर त्यांची लस ९४% प्रभावी आहे. मात्र, लसीकरण करण्यात आलेल्या समूहतील फक्त ८ संक्रमित लोकांच्या साहाय्याने हे निष्कर्ष कसे काढले गेले, हे अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. सोबतच, यावेळी समूहात वयोगटानुसार विभागणी करण्यात आली नव्हती.

हेही वाचा | कोव्हिड-१९वर मात केलेल्यांना थायरॉईडचा धोका !

या अभ्यासात पुरेशा संख्येत वयस्क लोकांचा समावेश होता व प्लेसबो (Placebo) ग्रहण करणाऱ्यांपैकी संक्रमित झालेल्यांविषयी विश्वास व्यक्त करताना साहिन म्हणाले, “ही लसी अतिशय धोका असलेल्या लोकसंख्येत खूप प्रभावी आहे.”

दुसरीकडे, अंतिम टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम विश्लेषणातून मिळालेल्या परिणामांच्या आधारे मॉडर्नाने तिच्याद्वारे निर्मित कोरोना विषाणूवरील लस ९४.५% प्रभावी असल्याचा दावा या आठवड्यात केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: