भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नियुक्ती केली. सोबतच, कलराज मिश्रा यांची राजस्थान, बंडारू दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेश, तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणा व आरिफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला आहे. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. सोबतच, महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या राष्ट्रपतींतर्फे करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल बनले आहेत. आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या, तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येईल याचा कयास सुरू झाला होता. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, कोश्यारी यांची राज्याच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे.

 

कोण आहेत भगत सिंह कोश्यारी ?

– भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी उत्तराखंडमध्ये झाला आहे.

– उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.

– भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.

– 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

– 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: