गडकिल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्यावर द्या : राज ठाकरे

ब्रेनवृत्त | मुंबई 

राज्य शासनाच्या ऐतिहासिक स्थळासंदर्भातल्या पर्यटन धोरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरेर यांनी भाजप सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहे. गडकिल्ले पर्यटनासाठी भाड्याने देण्याऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज्यातील गडकिल्ल्यांना हात लावायचाही प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज सध्या डोंबिवली दौऱ्यावर आहेत.

गड किल्ल्यांना भाडेतत्त्वावर देऊन पर्यटन विकास करण्याचे आगळे-वेगळे धोरण राज्य शासनाने आखले आहे. वर्ग २ मध्ये येणारे सुमारे ३०० किल्ल्यांना भांड्यावर देण्यात येणार आहे. यामुळे सगळीकडे जोरदार राजकीय रणकंदन सुरु आहे. राज्यभरातूनच नव्हे, तर देशभरातून ऐतिहासिक वास्तू संवर्धनाच्या उद्देशाने कार्य करणाऱ्या व सामान्य जनतेकडून देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकांचा वर्षाव होतो आहे. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील उडी घेतली आहे. डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी थेट राज्य शासनाला “गडकिल्ले भाड्याने देण्याऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या”, असे म्हटले आहे.

किल्ले प्रतापगडावर पोहचण्यासाठी ‘रोपवे प्रकल्प

राज्यातील गडकिल्ल्यांना हातही लावायची हिंमतही शासनाने करू नये, नाहीतरी गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशाराही त्यांनी केला आहे. राज म्हणाले की, “राज्यातल्या गड किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करू नका. तसे केल्यास महाराष्ट्रातले इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे.”

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस !

पर्यटन विकास म्हणून राज्यशासन आगळे-वेगळे धोरण आखले आहे. लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातले गडकिल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त सगळीकडे प्रसारित झाले होते. त्यावर राज्याच्या पर्यटन विभागाने स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, राज्यात वर्ग १ आणि वर्ग २ असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात व ते संरक्षित वर्गवारीत आहेत. अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात व ते संरक्षित वर्गवारीत नाहीयेत, म्हणून या वर्गातील किल्ल्यांना खाजगी गुंतवणूकदारांना भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: