आरबीआयकडून रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात

ब्रेनवृत्त | मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सर्वसामान्य नागरिकांना कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढविली आहे. कर्जाचे हफ्ते फेडण्याची मुदत आधी ३१ मे पर्यंत दिली होती. त्यात आता आणखी तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच, आता ३१ ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना शशिकांत दास म्हणाले, कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरातील आर्थिक घडामोडींवर झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जावरील व्याज कमी होणार आहे. तसेच, रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे महागाई दर नियंत्रणात राहील, अशी आरबीआयला अपेक्षा असल्याचे दास यांनी सांगितले.

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास

आरबीआयच्या परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

– परकीय गंगाजळी वाढविण्यासाठी एक्सपोर्ट इमपोर्ट बँकेला (EXIM Bank) १,५०० कोटी रुपयांचा निधी देणार.

– रिव्हर्स रेपो रेट ३.३५% वर आणला.

– औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मार्च अखेरीस १७%, तर मुलभूत उद्योगातील उत्पादनात ६.५% घट

– २०२० -२१ मध्ये परकीय गंगाजळीत ९.२ अरब (बिलियन) ने वाढ, तर १५ मे पर्यंत एकूण परकीय गंगाजळीत ९.२ बिलियन डॉलर इतकी झाली आहे.

– ‘स्थूल राष्ट्रीय उत्पन्न’ (जीडीपी) वाढ येत्या काळात नकारात्मक राहणार.

– २०२० च्या पूर्वार्धात महागाई वाढणार, तर उत्तरार्धात महागाई कमी होणार.

वाचा : आयसीआयसीआय बँकेचे मुख्यालय मुंबईत स्थलांतरित होणार

रेपो (RR) व रिव्हर्स रेपो रेट (RRR) म्हणजे काय?

देभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतात, त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला ‘रेपो रेट’ (Repo Rate) म्हणतात. तर, ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला ‘रिव्हर्स रेपो रेट’ (Reverse Repo Rate) म्हणतात.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: