बँकिंग व्यवस्था स्थिर व सुरक्षित असल्याची आरबीआयची ग्वाही

ब्रेनवृत्त , मुंबई

भारतीय वित्तीय आणि पत व्यवस्था मजबूत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अनेक बँकांवर निर्बंध आणले जात असले, तरी देशातील बँकिंग व्यवस्था सुरक्षित असल्याची ग्वाही आरबीआयने दिली आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवरील निर्बंध आणल्यानंतर समाज माध्यमांवर बँकिंग व्यवस्थेबाबत समाज माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या संदेशांमुळे निर्माण झालेला संभ्रम आरबीआयने काल एका ट्विटद्वारे दूर केला आहे.


पंजाब-महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकवर आलेल्या निर्बंधांनंतर समाजमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या विविध नकारात्मक संदेशांमुळे समाजात निर्माण होणाऱ्या संभ्रमाला दूर करण्याचे पाऊल आरबीआयने उचलले आहे. अनेक बँकांवर निर्बंध आले असले, तरी भारतीय बँकिंग व्यवस्था भक्कम आणि सुरक्षित असल्याची ग्वाही रिझर्व्ह बँकेने एका ट्विटरद्वारे दिली आहे. बँकिंग व्यवस्थेविषयी सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

विविध कर्ज रेपो रेटशी जोडण्यासाठी आरबीआयचे बँकांना आदेश

पीएमसी बँकेवरील निर्बंधांनंतर इतर काही बँकासुद्धा बंद होणार असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. सोबतच, भांडवली बाजारात बँकिंग शेअर्समधील पडझडीने नागरिकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो आहे, असे निदर्शनात आल्यानंतर आरबीआयने संबंधित पाऊल उचलले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: