कॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’

ब्रेनवृत्त | पुणे

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ला प्रकरणाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) सध्या दुबईत असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून वर्तविला आला आहे. प्रख्यात तपास संस्था इंटरपोलने दहा दिवसांपूर्वी भारतातील रुपे कार्डमार्फत पैसे काढणाऱ्या या टोळीच्या मास्टरमाईंड विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली. त्यामुळे लवकरच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकणार असूूून, गुन्हेगाराला अटक केल्या जाण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरणाच्या तब्बल दोन वर्षांनंतर इंटरपोलने ही नोटीस बजावली आहे.

याबाबात आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले की, मागील सहा ते सात महिन्यांपेक्षा अधिककाळ आम्ही इंटरपोलशी संपर्कात असून त्यांनी या प्रकरणातील भारतातील सर्व व्यवहारामागील मुख्य सुत्रधाराच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. सध्या तो दुबईत असल्याचे सांगितले जात आहे. हॉंगकॉंगमधील बॅंकेत गोठविले गेलेल्या 11 कोटी रुपयांपैकी 5 कोटी रुपये परत मिळविण्यात यश आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सायबर गुन्हेगारांनी कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीच सर्व्हरचा प्रॉक्सी स्वीच उभारून 28 देशांतून एकाचवेळी एटीएममधून 94 कोटी 42 लाख रुपये लंपास केले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मूळचा मुंब्रा येथील राहणारा असून, त्याने भारतातील विविध शहरांमधील एटीएम सेंटरमधून जे पैसे काढले गेले, त्यांना क्लोन केलेले कार्ड व पासवर्ड पूरविण्याचे काम केल्याचे तपासात समोर आले.

वाचा | सायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण

भारताबरोबरच जगभरातील २८ देशांमधील एटीएममधून ११ व १३ ऑगस्ट २०१८ रोजी एटीएममधून ९४ कोटी ४२ लाख रुपये काढण्यात आले होते़ त्यात भारतातील विविध शहरांमधून रुपे डेबीड कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहारांद्वारे २ कोटी ५० लाख रुपये काढण्यात आले होते़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here