Site icon MarathiBrain.in

रिलायन्स जिओ बंद करणार ‘टॅरिफ प्रोटेक्शन सर्व्हिस’!

ब्रेनवृत्त, २८ डिसेंबर

जिओव्यतिरिक्त अन्य कंपन्यांच्या नंबरवर मोफत कॉलिंगची सेवा बंद केल्यानंतर आता रिलायन्स जिओने दुसरा एक झटका ग्राहकांना दिला आहे. रिलायन्स जिओ या दूरसंचार कंपनीने ‘शुल्क संरक्षण सेवा’ (टॅरिफ प्रोटेक्शन सर्व्हिस) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणताही प्लॅन सुरू नसलेल्या ग्राहकांना आता वेगळा रिचार्ज करावा लागणार आहे.

रिलायन्स जिओ या दूरसंचार कंपनीने कोणताही प्लॅन सुरू नसलेल्या (नॉन ऍक्टिव्हप्लॅन युझर्स) ग्राहकांसाठी सुरू असलेली टॅरिफ प्रोटेक्शन सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशा सर्व ग्राहकांना कंपनीच्या सर्व्हिसचा पुन्हा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र रिचार्ज करावा लागणार आहे.

एअरटेलची ‘अमर्यादीत कॉलिंग सुविधा’ आजपासून परत लागू

रिलायन्स जिओने ६ डिसेंबर रोजी नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा केली होती. त्यानुसार नवीन प्लॅन १२९ रूपयांपासून, तर अन्य कंपन्यांचे प्लॅन १४९ रूपयांपासून सुरू होत आहेत. तसेच, जे ग्राहक कोणत्याही चालू प्लॅनशी जोडले गेलेले नाहीत किंवा ज्यांच्या मोबाईल क्रमांकावर कोणताही प्लॅन ऍक्टिव्हेट नाही, अशा ग्राहकांसाठी कंपनीनं टॅरिफ प्रोटेक्शन प्लॅनची सेवा सुरू केली होती. मात्र ही सेवाही आता बंद करण्याचा निर्णय जिओने घेतला आहे. हा प्लॅन बंद केल्यानंतर आता सर्व ग्राहकांना कंपनीच्या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी रिचार्ज करावं लागणार आहे. जिओच्या नव्या प्रीपेड प्लॅनची सुरूवात ९८ रूपयांपासून होते, तर कॉलिंग मिनिटांसोबत येणाऱ्या प्लॅनची सुरूवात १२९ रूपयांपासून होते. तसेच, सध्या कंपनीकडून अन्य कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ६ पैसे प्रति मिनिटाचा दर आकारला जातो.

 

◆◆◆

Exit mobile version