अबब! कोटींच्या बोलीसह आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश!

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


भारतीय प्रिमीयर लीगच्या नुकत्याच पार पडलेल्या नवीन संघांसाठीच्या अंतिम बोलीनंतर दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.  आरपीएसजी समूह आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक फर्म आयरेलिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने (CVC कॅपिटल पार्टनर्स) आयपीएलमधील दोन नवीन फ्रँचायझींचे मालकी हक्क जिंकले आहेत. आरपीएसजी ग्रुपने तब्बल 7,090 कोटी रुपयांच्या विजयी बोलीसह लखनऊ संघाची मालकी जिंकली, तर सीव्हीसी कॅपिटलने 5,६२५ कोटींच्या दुसऱ्या क्रमांकावरील  विजयी बोलीसह अहमदाबाद संघाला निवडले आहे.

दोन्ही संघांच्या मालकीची रु. २००० कोटी ही मूलभूत किंमत ठेवण्यात आली होती. लखनऊ आणि अहमदाबाद या संघांची मालकी जिंकलेल्या दोन्ही वरील दोन्ही समूहांनी आधारभूत किंमतीपेक्षा ३५०% आणि २५०% अधिक रक्कमेची बोली लावली होती. “आमच्या बोलीमध्ये बरेच नियोजन आणि गणना करण्यात आली आहे. मी बोली जिंकण्याचे श्रेय माझ्या वैयक्तिक कर्मचार्‍यांना देतो,” असे संजीव गोयंका म्हणाले. संजीव गोयंका यापूर्वी रायझिंग पुणे सुपरजायंटचे मालक होते. CVC कॅपिटल पार्टनर्स हे फॉर्म्युला १ चे मालक होते. 

हेही वाचा । भारताने ८व्यांदा जिंकले सॅफ अजिंक्यपद; सुनील छेत्रीची मेस्सीशी बरोबरी!

ताज दुबई येथे आज (सोमवारी) आयोजित झालेल्या अंतिम बोलीमध्ये दोन फ्रँचायझींच्या मालकीसाठी एकूण 10 पक्षांनी बोली लावली. फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड आणि अदानी ग्रुप यांनी संघ खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. निविदाकारांकडे त्यांच्या संघाचे स्थळ म्हणून अहमदाबाद, लखनऊ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी आणि इंदूर या सहा केंद्रांमधून निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होता. 

सर्व पक्षांना वैयक्तिक व आर्थिक ओळखपत्रांसाठी आणि बोलीसाठी असे दोन स्वतंत्र लिफाफे सादर करण्यास सांगण्यात आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बोली लावणाऱ्यांची कायदेशीर माहिती लेखापरीक्षण अधिकारी यांच्यामार्फत तपासली आणि ते नियमानुसार असल्याचे समजल्यानंतरच बोली असलेले दुसरे लिफाफे उघडले गेले.

नक्की वाचा । ‘नीरज’ने फुलवले भारताचे ‘सुवर्णकमळ’! 

> आयपीएल २०२२ : १० संघ – ७४ सामने

आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश झाल्यामुळे येत्या २०२२ मधील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत एकूण १० समावेश असेल आणि एकूण ७४ सामने खेळले जातील. “संघांची मालकी जिंकलेल्यांनी बोलीनंतरच्या सर्व प्रक्रिया जर व्यवस्थितरित्या पार पाडल्या, तर पुढील सत्रापासून दोन्ही नवे संघ स्पर्धेत सहभागी होतील. आयपीएलच्या २०२२ च्या सत्रात एकूण १० संघ सहभागी होतील आणि एकूण ७४ सामने खेळले जातील. यामध्ये प्रत्येक संघाला स्थानिक मैदानावर ७ सामने आणि इतर मैदानांवर ७ सामाने खेळायला मिळतील”, असे बीसीसीआयने बोलीनंतर जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आमच्या टेलिग्राम वाहिनीत सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: