कोरोनाची लाट अद्याप संपलेली नाही : आरोग्य मंत्रालय

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


भारतातील कोरोना विषाणूची दुसरी लाट अद्याप संपलेली नसून,  देशातील 75 जिल्ह्यांमध्ये विषाणूचे प्रमाण अजूनही १० टक्क्यांहून अधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज म्हटले. याव्यतिरिक्त, देशातील  ९२ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण ५ ते १० टक्क्यांमध्ये असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे. 

देशभरातील कोव्हिड-१९ च्या परिस्थितीविषयी माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले की, आतापर्यंत तपासण्यात आलेल्या देशभरातील 45,००० नमुन्यांपैकी 48 नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचे संक्रमण आढळले आहे. यांपैकी सर्वांधिक २० नमुने महाराष्ट्रातून प्राप्त झाले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना विषाणूच्या या गंभीर प्रकरापासून बाधित प्रकरणांचे प्रमाण एकूण प्रकरणाच्या तुलनेत २० जून २०२१ पर्यंत ५१% पर्यंत वाढले आहे. मे, २०२१ मध्ये हे प्रमाण फक्त १० टक्के होते”, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  “भारतातील 90 टक्के कोव्हिड-१९ प्रकरणे ही बी.1.617.2 (डेल्टा) प्रकाराच्या संक्रमणाची आहेत”, असेही  ते म्हणाले.

हेही वाचा । कोरोना काळातही ‘योग आशेचा किरण’ आहे : पंतप्रधान मोदी

कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ह्या दोन्ही कोव्हिड-१९ लसी ‘सार्स-सीओव्ही-२’ आजाराच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा या विषाणू प्रकारांविरूद्ध (व्हेरियंट) कार्य करतात, असे शासनाने म्हटले आहे.  दुसरीकडे, डेल्टा प्लस व्हेरिएंटविरुद्ध या लसी कार्य करतात की नाही, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या सुरु आहेत, असेही शासनाने म्हटले. 

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

 

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

 

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: