शिल्पाच्या अडचणी वाढल्या; लखनऊमध्ये मायलेकींवर गुन्हा दाखल!

वृत्तसंस्था | आयएएनएस

ब्रेनवृत्त | मुंबई


पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर व हंगामा २ मुळे सद्या चर्चेत असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता एका फसवणुकीच्या प्रकरणात लखनऊमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात शिल्पा व तिची आई सुनंदा शेट्टीचे नाव समोर आले आहे. 

निरोगीपणा केेंद्राच्या (वेलनेस सेंटर) नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाच्या संदर्भात शिल्पा आणि सुनंदा शेट्टी यांची  चौकशी करण्यासाठी लखनऊ पोलीस मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा | शिल्पा शेट्टी व राज कुंद्रावर सेबीने ठोठावला ₹३ लाखांचा दंड

आयएएनएसला प्राप्त माहितीनुसार, लखनऊच्या हजरतगंज आणि विभूतीखंड पोलीस स्थानकात प्रत्येकी एक असे दोन प्राथमिक माहिती अहवाल (FIRs) दाखल करण्यात आले आहेत. परिणामी, लखनऊ पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू केला आहे. 

(हे अद्ययावत होणारे वृत्त आहे.) 

 


आमच्या टेलिग्राम वाहिनीचे मोफत सभासद व्हा : @marathibrainin


विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: