‘बिग बॉस’ शिवला जेतेपदासह मिळालं अजून बरंच काही!

बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकवल्यानंतर शिवला मिळालेले १७ लाख रुपये तो त्याच्या आईकडे देणार असून, त्यांतून घरासाठी घेतलेले बँकेचे कर्ज फेडणार असल्याचे तो म्हणाला आहे.

 

ब्रेनवृत्त | मुंबई

अमरावतीचा शिव ठाकरे याने काल बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेटेपद पटकावत, आपणच बॉस असल्याचे दाखवून दिले आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या काल रंगलेल्या अंतिम फेरीत शिव ठाकरे विजेता, तर अभिनेत्री नेहा शितोळे उपविजेती ठरली आहे.

मागील १०० दिवसांपासून रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ च्या दुसऱ्या पर्वाची काल सांगता झाली. या पर्वाचं विजेतेपद कुणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काल झालेल्या अंतिम फेरीत अमरावतीच्या शिव ठाकरेने आपणच या घरातले बॉस असल्याचं दाखवून दिले आहे, तर नेहा शितोळे उपविजेता ठरली आहे. वीणा जगताप सोबत असलेल्या मैत्रीमुळे शिव बिग बॉसच्या या संपूर्ण पर्वात चर्चेत होता. दुसऱ्या पर्वात शिवसोबत नेहा शितोळे, वीणा जगताप, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर हे स्पर्धक सुरवातीच्या सहा मध्ये होते.

स्वप्निल जोशीच्या बहुचर्चित ‘मोगरा फुलला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

● १७ लाखांच्या बक्षिसाचे शिव काय करणार ?

काल झालेल्या महाअंतिम फेरीत बिग बॉस ठरलेला शिव १७ लाखांचा मानकरी ठरला आहे. या बक्षिसाचे शिव काय करणार असल्याचेही त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. शिव हे सतरा लाख रुपये आईला देणार आहे. त्याने अमरावतीकडे एक घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. शिव हे कर्ज त्याला मिळालेल्या या बक्षीसेच्या रक्कमेतून भरणार आहे.

 

● शिवला मिळाली चित्रपटाची ऑफर

माध्यमांशी आपल्या भावना व्यक्त करताना शिव म्हणाला आहे की, “बिग बॉस मराठी चे होस्ट महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची ऑफर दिल्याने मला खूप जास्त आनंद झाला आहे. तसंही मला आधीपासून अभिनय श्रेत्रात करियर कराची इच्छा होती. सोबतच, मांजरेकर यांनी मराठी चित्रपटामध्ये संधी दिली असली, तरी मराठीबरोबरच हिंदीमध्येही काम करायला आवडेल असेही शिवने बोलताना सांगितले.

26 मे रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सुरुवातीला 15 जणांनी प्रवेश केला होता. वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अजून दोघांनी प्रवेश केल्यावर एकूण १७ जणांमध्ये स्पर्धा झाली. एलिमीनेशन पद्धतीने ११ स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले, तर अभिजित बिचुकले आणि शिवानी यांचे येणे-जाणे सुरू होते. बिग बॉसचे हे दुसरे पर्व घरघुती भांडणे, रोमान्स, गॉसिप यामुळेच जास्त चर्चेत राहिले. मराठी मनोरंजन विश्वातील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या पर्वाचंही खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केलं. सोबतच, विकेंड डावमधून ते स्पर्धकांना करत असलेल्या बेधडक मार्गदर्शनामुळे प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय बनले.

 

● ‘बिग बॉस’ शिव ठाकरे
मूळचा अमरावतीचा असलेला शिव ठाकरे हा ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मराठी बिग बॉसच्या घरात सुरुवातीला तो प्रेक्षकांवर प्रभाव पाडू शकला नसला, तरी हळूहळू विविध टास्क्समधून त्याने आपली छाप पडायला सुरुवात केली. यामुळेच त्याने या पर्वाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
दरम्यान, या पर्वाचे विशेष म्हणजे वीणा जगतापसोबतची त्याची जमलेली मैत्री. बिग बॉसनंतर शिव आणि वीणा लग्न करणार असल्याचे दोघांनीही आधीच जाहीर केले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: