“हे काय रामराज्य आहे?”

ब्रेनवृत्त | मुंबई


लखीमपूर खेरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी शासनावर टीका केली आहे. हे काय रामराज्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी टीका केली आहे. तसेच, प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

लखीमपूर खेरी येथे झालेल्या संघर्षाबद्दल बोलताना राऊत यांनी संघ शासनावर संताप व्यक्त केला आहे. “मोदी सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी”, असे यावेळी बोलताना ते म्हणाले. “हे काही रामराज्य आहे का? तुम्ही माफी मागत आहात का ? शेतकऱ्यांना चिरडण्याचा विषय आहे. यावर माफी मगितलीच पाहिजे. देशात अघोषित आणिबाणी सुरू आहे. तरीही, शेतकरी व जनता लढतच राहील”, असे राऊत म्हणाले. 

राणे यांनी बोलताना संयम बाळगायचं होतं : देवेंद्र फडणवीस

शासनाकडून माफीच्या मागणी सोबतच त्यांनी प्रियंका गांधींना ताब्यात घेतल्याच्या प्रकरणाचा निषेध केला आहे. प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, की प्रियंका गांधी यांच्याशी तुमचे राजकीय वैर असू शकते, काँग्रेसशी असू शकते. पण त्यांचा गुन्हा काय आहे, की कोणत्याही वॉरंटशिवाय त्यांना ताब्यात घेतलं?

“त्या इंदिरा गांधी यांची नात आहे, त्या महिला आहेत. ज्या पद्धतीने पोलिस प्रियांका गांधी यांच्याशी वागले ते आदेशच होते”, असेही संजय राऊत म्हणाले.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: