कुंभमेळ्यानिमित्त विशेष डाक तिकीट जाहीर

मराठीब्रेन वृत्त

नवी दिल्ली, २ फेब्रुवारी 

प्रयागराज (अलाहाबाद) येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनातर्फे विशेष डाक तिकीट जाहीर करण्यात आले आहे.केंद्रीय रेल्वे आणि संचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी हे तिकीट आज जाहीर केले. भारतीय डाक खात्यातर्फे तयार करण्यात आलेल्या या तिकिटाची किंमत पाच रुपये आहे.

शासनातर्फे कुंभमेळ्यानिमित्त विशेष डाक तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

कुंभमेळा हा फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव नसून खगोलशास्त्रीय उत्सव असल्याचे मनोज सिन्हा तिकीट जाहीर करताना म्हणाले. “कुंभ हा फक्त भारताचा मेळावा नसून संपूर्ण देशाचा मेळा आहे. कुंभमेळा हा फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव नसून, तो सांस्कृतिक, ज्योतिषशास्त्रीय व खगोलशास्त्रीय सोहळा आहे”, असे ते म्हणाले.

कुंभमेळा सांस्कृतिक, खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय सोहळा असल्याचे केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा म्हणाले.

रामदेवबाबा साधूंना म्हणाले ‘चिलम ओढणे सोडा!’

कुंभमेळा ज्ञानप्रकाशाचे स्रोत असल्याचेही केंद्रीय मंत्री मनोज सिंह यावेळी म्हणाले.

 

(स्रोत : पत्र सूचना कार्यालय)

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: