मराठा आरक्षणासाठी राज्याची न्यायालयाकडे घटनापीठ स्थापण्याची विनंती

मराठा आरक्षणाची तातडीने सुनावणी होण्यासाठी स्वतंत्र घटनापीठ सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावी, अशी विनंती परत एकदा राज्य शासनाने केली आहे

 

ब्रेनवृत्त | मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने घटनापीठाची स्थापना करावी, अशी लेखी विनंती राज्य शासनाने सरन्यायाधीशांकडे केली आहे. सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करण्याविषयीची राज्याची ही दुसरी लेखी विनंती आहे.

मराठा आरक्षणाची तातडीने सुनावणी होण्यासाठी स्वतंत्र घटनापीठ सर्वोच्च न्यायालयाने स्थापन करावी, अशी विनंती परत एकदा राज्य शासनाने केली आहे. या संदर्भी काल (बुधवारी) दुपारी राज्य शासनातर्फे अ‍ॅड. सचिन पाटील यांनी संबंधित लेखी विनंती अर्ज सादर करण्यात आला. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अर्ज करण्यात येणार असल्याचे मंगळवारी सांगितले होते.

मराठा (एसईबीसी) आरक्षणाला स्थगिती देणारा ९ सप्टेंबर रोजीचा न्यायालयाचा अंतरिम आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, अशी विनंतीही सर्वोच्च न्यायालयाकडे या अर्जातून करण्यात आली आहे. यापूर्वी ७ ऑक्टोबर २०२० रोजी राज्य शासनाने सरन्यायाधीशांना याबाबत लेखी विनंती केली होती.

वाचाअनुसूचित जाती-जमातींतर्गत गटनिहाय आरक्षण शक्य : सर्वोच्च न्यायालय

“सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे राज्य शासनाच्या अनेक नोकरभरती प्रक्रिया व विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रकिया प्रभावित झाल्या आहेत. हजारो विद्यार्थी व उमेदवारांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे प्रकरण तातडीने घटनापीठासमोर सुनावणीस घेण्यात यावे”, असे राज्य शासनाच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. राज्य शासनाने पाठवलेल्या विनंती अर्ज व इतर बाबींवर न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठ सुनावणी करेल.

◆◆◆

अशीच विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Subscribe on Telegram@marathibrainin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: