चंद्राच्या सुर्यप्रकाशित भागावरही पाणी ; नासाने दिली चंद्रावर भरपूर पाणी असल्याची खात्री

सोफिया या हवाई वेधशाळेने चंद्रावर पाण्याचा शोध लावला असून, हे पाणी अंतराळवीरांना वापरण्याजोगे आहे. तसेच, चंद्राच्या सूर्यप्रकाशीत भागांतही पाणी असल्याचा शोध नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेने लावला आहे.

 

ब्रेनवृत्त | नागपूर

चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची खात्री अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळ प्राधिकरणाने (NASA : National Aeronautics & Space Administration) दिली आहे.”सोफिया (SOFIA : Stratospheric Observatory for Infrared Astronomy)  या हवाई वेधशाळेच्या साहाय्याने आम्हाला पहिल्यांदाच चंद्रावर भरपूर पाणी असल्याची खात्री झाली आहे”, अशी माहिती संस्थेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. चंद्रावरील हे पाणी भरपूर प्रमाणात व सहज वापरण्याजोगे असून, याचा फायदा अंतराळवीरांना होणार असल्याचेही ‘नासा’ने म्हटले आहे. 

‘नासा’ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रावर पाणी सापडल्याच्या त्यांच्या आधीच्या शोधाला पुष्टी दिली. आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती देताना नासाने म्हटले आहे की, त्यांच्या सोफिया या हवाई वेधशाळेने चंद्रावर पाण्याचा शोध लावला असून, हे पाणी अंतराळवीरांना वापरण्याजोगे आहे. तसेच, चंद्राच्या सूर्यप्रकाशीत भागांतही पाणी असल्याचा शोध नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेने लावला आहे.

वाचा | लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला

चंद्रावर पाणी सापडणे महत्त्वाचे असल्याचेही नासाने म्हटले आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादीत नसून, चंद्राच्या  सूर्यप्रकाशीत पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याची माहिती या शोधातून समोर आली आहे.

दुसरीकडे, या शोधानंतर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. या दोन अंतराळवीरांमध्ये एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर सहभागी असेल. या दृष्टीने चंद्रावर पाणी सापडल्याने आता नासाच्या या अभियानाला मदतच होईल.

वाचा | चीन तयार करतोय ‘कृत्रिम चंद्र’ !

● चंद्रावर पाण्याचा पहिला पुरावा ‘चांद्रयन १’द्वारे

चंद्रावर पाणी असल्याचा सर्वात पहिला पुरावा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इसरो) राबवलेल्या ‘चंद्रयान-1‘, अमेरिकेच्या कॅसिनी (Cassini) व डीप इम्पॅक्ट प्रोब (Deep Impact Probe) या तीन मोहिमांतून देण्यात आला होता. एका विशिष्ट तरंगलांबीवर (Wavelength) अवरक्त प्रकाश (Infrared Light) किरणांचे  शोषण झाल्यांनंतर त्या ठिकाणी पाणी किंवा हायड्रॉक्सिल (ऑक्सिजन व हायड्रोजनने बनलेले रेणू) उपस्थित असल्याचे या मोहिमांतून शोधण्यात आले होते. या हायड्रॉक्सिल अथवा पाण्याचे प्रमाण खालील अक्षवृतांपेक्षा ध्रुवावर जास्त असल्याचे अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: