‘कोव्हिड-१९’वरील चौथ्या भारतीय लसीच्या उत्पादनास होणार सुरुवात

भारत बायोटेक-आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिन (COVAXIN), झायडस सीव्ही (झायडस कॅडिला), कोव्हीड शिल्ड (ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूट) व आता बीई अशा चार लसींचे भविष्यात उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

कोरोना विषाणूवर प्रतिबंध लस निर्माण करण्यासाठी हैदराबादमधील अजून एक कंपनी, ‘बायोलॉजिकल ई’नेे (Biological E) जगप्रसिद्ध ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे भारतात स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन (COVAXIN), झायडस सीव्ही, कोव्हिड शिल्ड या लसींनंतर आता ‘बीई’ ही चौथी स्वदेशी लस उपलब्ध होणार आहे.

भारतीय लस संघटनेच्या (Indian Vaccine Association) शिष्टमंडळाने बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची काल भेट घेतली. त्यावेळी लस विषयी सांगताना बायोलॉजिकल ई कंपनीने सांगितले की, ‘कोव्हिड-१९’वर प्रतिबंधक उपाय म्हणून लस तयार करण्यासाठी आम्ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीशी करार केला आहे.

‘कोव्हॅक्सीन’ची मानवी चाचणी सुरु ; ३० वर्षीय स्वयंसेवकाला पहिला डोस 

जॉन्सन अँड जॉन्सन बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने निधी पुरवावा या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या सदस्यांची ही भेट घेतली. ही परिषद केंद्रीय जैवतंत्रज्ञान खात्याच्या अख्यत्यारीत येते.

‘बायोलॉजीकल ई’च्या या निर्णयानंतर कोरोनावरील चौथी भारतीय बनावटीची लस उपलब्ध होणार आहे. भारत बायोटेक-आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिन (COVAXIN), झायडस सीव्ही (झायडस कॅडिला), कोव्हीड शिल्ड (ऑक्सफर्ड-सिरम इन्स्टिट्यूट) व आता बीई अशा चार लसींचे भविष्यात उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय बनावटीच्या दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरू

 

दुसरीकडे, भारताला ६० ते ७० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस लागतील असा अंदाज लस या विषयावरील कृती गटाचे प्रमुख व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी नुकताच व्यक्त केला आहे. तसेच, भारताने अद्याप कोणाकडूनही लसखरेदीसाठी करार केलेले नाहीत. मात्र असे करार काही कंपन्यांशी अमेरिका, इंग्लंड, युरोपीय समुदायातील देश, स्वित्झर्लंड, जपान यांनी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here