‘मॉडर्ना’ची ‘कोव्हिड-१९’वरील लस आणि चाचणीचे टप्पे

अमेरिकेची जैवतंत्रज्ञान (Biotechnology) कंपनी ‘मॉडर्ना इंकॉर्पोरेटेड’ (Moderna Inc.) कोरोना विषाणूवरील पहिली लसीची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

 

ब्रेनविश्लेषण | २० मे

संपूर्ण जगभरात ‘कोरोना विषाणू‘च्या प्रादुर्भावाने चिंतेचे वातावरण आहे. या भयावह वातावरणात पुन्हा एक आशेचा किरण दिसून आला आहे. अमेरिकेची जैवतंत्रज्ञान (Biotechnology) कंपनी ‘मॉडर्ना इंकॉर्पोरेटेड’ (Moderna Inc.) कोरोना विषाणूवरील पहिली लसीची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी एन्ड इन्फेक्सियस डिजिजेस’मध्ये घेण्यात आलेल्या चाचणीत ही लस प्रतिपिंडे (Anti Bodies) तयार करून कोरोनाच्या विषाणूला निष्क्रिय करते, असा असा दावा केला आहे.

मॉडर्ना इंकॉर्पोरेटेड, अमेरिका

‘मॉडर्ना’ने केलेल्या दाव्यानुसार, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये आढळणाऱ्या प्रतिपिंडांएवढी पातळी ही लस दिलेल्या व्यक्तींमध्ये आढळली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. टाल जॅक्स यांनी सांगितले की, या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ‘mRNA-1273’ ही लस कोरोनावर प्रभावी ठरू शकते, असे आढळले आहे. या लसीच्या चाचणीचा पुढील व्यापक टप्पा हा जुलैमध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या लसीचे मुबलक प्रमाणत उत्पादन करण्याबाबतही कंपनी विचार करत आहे.

● लसीची चाचणी कशी घेतली जाते ?

या लसीची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यावर होते. पहिल्या टप्प्यात ‘कोव्हिड-१९‘चे संक्रमण झालेल्या व्यक्तीला ही लस दिल्यानंतर त्याच्या शरीरावर लसीचा कसा परिणाम होतो, संक्रमण दूर करण्यास किती वेळ लागतो, तसेच लसीचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते. या चाचणीत संक्रमित व्यक्तीला लसीचे दोन कमी प्रमाणात शॉट्स देण्यात आले. यावेळी, कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे त्याच्या शरीरात दिसू लागली. हे परिणाम यापूर्वी मंजूर झालेल्या कोणत्याही लसीसारखे दिसतात.

मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेंसेल यांच्या म्हणण्यानुसार, ऍण्टीबॉडीज तयार होणे हे एक चांगले लक्षण आहे, जे विषाणूंच्या वाढ होण्यास प्रतिबंधित करते.

● लसीचे दुष्परिणाम

कंपनीच्या मते या लसीचे दुष्परिणामही चाचणीमध्ये पहिले गेले. जेव्हा लसीचा डोस वाढविला गेला तेव्हा ताप, उलट्या होणे, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोकेदुखी असे दुष्परिणाम दिसू लागले. त्याचवेळी, मध्यम डोस इंजेक्शन दिलेल्या व्यक्तीची त्वचा लाल झाल्याचे निदर्शनास आले. तथापि, हे दुष्परिणाम दूर करण्यासाठी एका दिवसापेक्षा कमी वेळ लागला.

● लसीचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार ?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, लसीचा दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरु होऊ शकतो. सुरवातीला ६०० लोकांवर या लसीची चाचणी केली जाईल. लसीचे वेगवेगळ्या प्रमाणात डोस देऊन कमीतकमी दुष्परिणाम होतील, या अनुषंगाने लसीची मात्रा निश्चित केली जाईल. तथापि, कोरोनाबाबतच्या लसीच्या पहिल्या टप्प्याची इतकी चर्चा होणे गरजेचे नाही. परंतु कोरोनाचा कहर पाहता संपूर्ण जग एका सकारात्मक बातमीची वाट पाहत आहे. त्यामुळे मॉडर्नाने देखील पहिल्या चाचणीचे तपशीलवार वर्णन केले आहे.

● तीन टप्प्यात होणार चाचणी

या लसीचा कोणताही संक्रमित व्यक्तींवर दुष्परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेऊनच लसीची मात्रा दुसऱ्या टप्प्यातच ठरविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात लसीची चाचणी करतानाच लसीचा शरीरावर कसा परिणाम होत आहे, याचे बारकाईने निरीक्षण केले जाते. दुसरा टप्पा फक्त औषध कसे आणि कोणत्या प्रमाणात द्यायचे हे ठरवते.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: