ट्विटर इंडियाच्या भारतीय तक्रार अधिकाऱ्याची पायउतारणी !

वृत्तसंस्था । पीटीआय

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


नुकत्याच काही दिवसांपूर्वी नियुक्त करण्यात आलेले ट्विटरचे भारतातील अंतरिम रहिवासी तक्रार अधिकारी धर्मेंद चतुर यांनी आपला पदभार सोडला आहे. ट्विटरने काही दिवसांआधीच चतुर यांची तक्रार अधिकारीपदी नियुक्ती केली होती. पण आता ही जबाबदारी काढून घेतल्यानने त्यांचे नाव ट्विटरच्या संकेतस्थळावरुन काढून टाकण्यात आले.

धर्मेंद चतुर यांनी पदभार सोडल्याच्यानंतर भारतातील अंतरिम रहिवासी तक्रार अधिकाऱ्याचे पद रिक्त झाले होते. ट्विटरची सेवा वापरणाऱ्या लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन आयटी नियमांनुसार तक्रार अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. या घटनेच्या काही तासांनंतर ट्विटरने भारताच्या अंतरिम तक्रार अधिकरीपदी कॅलिफोर्नियामधील जेरेमी कैस्सेल यांची नियुक्ती केली आहे.

 

ब्रेनसाहित्य ।  समाजमाध्यमांचे ‘आभासी’ जग

दरम्यान, या प्रकरणावर ट्विटरने कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. विशेष म्हणजे, धर्मेंद चतुर यांच्या पदभार सोडण्याची घटना अशावेळी घडली आहे, जेव्हा मायक्रो-ब्लॉगिंग व्यासपीठ आणि भारत शासन यांच्यात नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांवरून चढाओढी सुरु आहेत. ट्विटर देशाच्या नवीन आयटी नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करत आहे व त्यांचे पालन करण्यात दिरंगाई करत आहे,या से म्हणत केंद्र शासनाने ट्विटरला फटकारले होते.

देशात २५ मे पासून सुधारित माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शकतत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र संहिता) नियम, 2021 [Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021]लागू करण्यात आले आहेत. या अंतर्गत देशात मोठ्या प्रमाणात विस्तयार असलेल्या समाज माध्यमांच्या (सोशल मीडिया) कंपन्यांना वापरकर्त्यांच्या व पीडितांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक तक्रार निवारण अधिकारी नेमणे आवश्यक आहे. 

हेही वाचा । भारताच्या ट्विटर प्रमुखाला कर्नाटक न्यायालयाचा तूर्त दिलासा

25 मे पासून अंमलात आलेले नवीन नियम सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांकडून किंवा पीडित व्यक्तींकडील तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याचा आदेश देतात. 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या समाज माध्यम कंपन्यांनी एक रहिवासी तक्रार अधिकारी नेमावे व त्याचे नाव व संपर्क तपशील सामायिकी करावे, असे नवीन नियमांत म्हटले आहे..

५ जून रोजी शासनाने जाहीर केलेल्या अंतिम नोटीसला उत्तर देताना ट्विटरने म्हटले होते, की ते नवीन आयटी नियमांचे पालन करण्यास तयार आहेत आणि त्याअंतर्गत मुख्य तक्रार अधिकाऱ्याचे तपशीलही सामायिक केले जाईल. दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने चतूर यानं काही दिवसांपूर्वी भारतासाठी अंतरिम रहिवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

 

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: