परिक्षांबाबत युजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना

यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केेली आहे.

 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केलेल्या परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायची आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केल्याची माहिती यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात युजीसीने सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

डॉ.भूषण पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनुष्यबळ विकास मंत्रालायने मानक प्रक्रिया पद्धती (SOP) बनवली असून, त्याला आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या पत्रकात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने म्हटलंय की, कोरोनाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीचे सर्वांना पालन करावे लागेल. त्याचबरोबर यूजीसीकडून या एसओपीचं पत्र देशातील ४० केंद्रीय विद्यापीठांनाही पाठविले आहे.
या  एसओपीमध्ये मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार, दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूचे दुसरी लक्षणं आहेत, त्यांना दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे किंवा दुसऱ्या वर्गात बसून द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर, परीक्षकांनाही मुखपट्टी (मास्क) आणि हातमोजे घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

परीक्षा केंद्रातील बैठक व्यवस्था अशी असेल

– परीक्षा हॉलमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बेंच रिकामा ठेवण्यात यावा
– दोन विद्यार्थ्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असेल
– एका वर्गात चार रांगा असतील यामध्ये त्यांच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या जागेची रिक्त जागा असेल.

युजीसीने जाहीर केलेली कार्यपद्धती (एसओपी)

– प्रत्येक परीक्षा केंद्रावर थर्मोगन उपलब्ध असेल
– परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टंसिंगचे विशेष पालन करण्यात येईल.
– परीक्षार्थींना आरोग्याशी संबंधित एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल.
– ज्या परीक्षार्थीने सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि थर्मोगनने तपासणी केलेली नसेल, त्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सांगण्यात येईल.
– परीक्षा केंद्रातील फरशी, दरवाजे, भिंती, फर्निचर, रेलिंग, जिना या सर्वांना निर्जंतुक केले जाईल.
– परीक्षेला उपस्थित असलेले परीक्षक, विद्यार्थी आणि इतर लोकांची नोंद केली जाईल. यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येईल.
– त्याचबरोबर परीक्षार्थींना आपल्या मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू’ अनुप्रयोग अनिवार्य असेल.
– सर्व परीक्षा केंद्रांवर हँड सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवले जातील.
– येण्याच्या आणि जाण्याच्या जागी गर्दी करता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: