‘शहरी नक्षलवाद : भ्रम आणि वास्तव’ – भाग १

प्रसंगानुसार काही सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न नक्षलवाद्यांकडून दूरदृष्टीने हाताळले गेले आहेत. त्यामुळे नक्षलवाद काल फार चांगला होता, तो आज फार वाईट झाला! हे म्हणणे, ‘नक्षलवाद’ विषयी सामान्य लोकांच्या मनात आस्था निर्माण करण्यासारखे आहे.

 

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

नक्षलवाद्यांनी २०१७ हे वर्ष ‘नक्षलवादाचे सुवर्ण वर्ष’ (!) म्हणून साजरे करायला जंगलात आणि शहरात १०० पेक्षा अधिक कार्यक्रम आयोजित केले होते. मुंबईतही असाच ‘अनुराधा गांधी मेमोरियल’ अंतर्गत एक महत्त्वाचा कार्यक्रम घेतला गेला. ही अनुराधा कोण? ‘अनुराधा शानबाग’ अर्थातच कोबाड गांधी यांची पत्नी. दोघेही ७०च्या दशकात मुंबईत नक्षल चळवळीच्या कामाला लागले. दरम्यान, ते दलित पँथरमुळे प्रभावित होऊन औरंगाबादला आले. त्या काळात दलितांच्या चळवळीचे केंद्र म्हणून नागपूर शहर ओळखला जायचे. त्यात महार वस्ती म्हणून प्रसिद्ध इंदोरा येथे विचारपूर्वक १२ ते १५ वर्ष सुरेंद्र गडलिंगच्या शेजारी ते राहिले. सुधीर ढवळेही ह्याच वस्तीत राहायला होता. सुरुवातीला अनुराधाने नागपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. त्याकाळात छोट्या-मोठ्या सगळ्याच सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, स्वतःहून अनेक सामाजिक विषयावर कार्यक्रम उभे करणे, कोराडी, चंद्रपूरसारख्या पॉवर प्लांटमधील मजदूर संघटनेची बांधणी करणे, त्यात नियोजनबध्द तरुणांना सामील करून त्यांच्याशी सततचा संपर्क बनवून ठेवणे, अशी कामे निरंतर चालायची. अत्यंत प्रेमळ आणि मदतगार स्वभावगुणामुळे ती कुणालाही नकळत आपलेसे करून टाकायची.

प्रातिनिधिक छायाचित्र स्रोत

१९९५ नंतर नक्षल संबंधांची चाहूल लागताच अनुराधा भूमिगत झाली. पुढे नेपाळपासून केरळपर्यंत सर्वत्र नक्षल चळवळींत ती सक्रिय होती. २०००च्या काळात ती केंद्रीय समितीची सदस्य झाली, पण मलेरियमुळे २००८ ला तिचा अंत झाला. परंतु तोपर्यंत नागपूर, पुणे, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई, हैदराबाद अशा अनेक शहरांतील आणि खेड्यातील तरुणांना नक्षलवादाच्या दिशेने प्रवृत्त करण्याचे काम पूर्ण झाले होते. भूमिगत असताना नक्षलवाद्यांना विविध विषयाचे प्रशिक्षण देणे, महिलांची मजबूत फळी उभारणे, अशा अनेक कामामुळे, नक्षलवादाच्या विकासात तिचे काम आजही आदर्श मानले जाते. तिच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. शोमा सेन आणि डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी २०१२ ला अनुराधाचे लिखित साहित्य संपादित करून, ‘Scipting the Change’ नावाने दिल्लीतील दानिश प्रकाशनाकडून प्रकाशित केला. दानिश प्रकाशनाच्या पुस्तक स्टॉलवर नक्षलवादाच्या अनुषंगाने २००७ला कारवाई झाली होती हेही विशेष.

अनुराधा कायम हार्डकोर नक्षलवादी होती. तिच्या कामातून समाजाला कोणत्या प्रेरणा दिल्या जाणार? नक्षलवाद्यांसाठी ‘हुतात्मा’ असलेल्या अनुराधावर मुंबईत भाषणाची सिरीज चालते. तर मग, हे आयोजक कोण समजायचे? पण हे सर्व, ह्या लोकशाहीवादी भारतातच शक्य आहे, तरी देश वाईटच! हे गांधी पती-पत्नी म्हणजे, विद्यार्थी ते शहरी नक्षलवादी आणि त्यानंतर भूमिगत नक्षलवादी होण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचे उदाहरण आहेत. तिच्या कार्यक्रमाला वरवरा राव याला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. वरवरा रावकडे खरच नक्षलवादाचे नैतिक पालकत्व आहे. त्याने चारू मुजुमदारपासून आजच्या गणपतीपर्यंत, अशा अधितर महत्वाच्या वक्तींसोबत नक्षलवादबाबत प्रदीर्घ चर्चा केल्या आहेत. नक्षलवादाच्या बऱ्या-वाईट सगळ्याच स्तरावरील सूक्ष्म बाबींचे त्याला नीट आकलन आहे. आयुष्याचे सर्वस्वी ध्येय ‘नक्षलवादाचा विजय’ यासाठी आयुष्य वाहून बसलेल्या या महामानवाने, त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक कविता आणि भाषणांनी उघडउघड नक्षलवादाचे समर्थन केल आहे. आयुष्यात अनेक नक्षल समर्पित शहरी संघटनेच्या जडणघडणीत याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यापूर्वी नक्षलवादाच्या अनुषंगाने त्याच्यावरही कार्यवाही झाली, पण विचाराची कास त्याने  कधीच सोडली नाही.

एक कथा आहे, त्याने सत्यमुर्ती ह्या कोंडापल्लीच्या बरोबरीच्या साथीदाराला नक्षलवादातून १९८६ ला काढून फेकले, कारण तो चळवळीत चालणाऱ्या जातीवादाच्या विरोधात बोलायचा आणि आंबेडकरवाद सांगायचा. त्याचे खंडन करायला आणि नक्षलवादीची अब्रू वाचवायला शहरी व्यक्ती म्हणजे वरावरा राव! कालपरवाच्या भाषणात आदिवासी आणि दलित समाजाला नक्षलवादाचे स्वाभिमान मिळवून दिल्याचे भाष्य तो करतो. हे राजकारण कशाला? हे उघड आहे. जेव्हा जमेल तेव्हा आदिवासी आणि दलित चळवळी जवळ करा, हे नक्षलच्या डॉक्युमेंटमध्ये जाहीर होते. अशी सर्व समिकरणे, शहरी नक्षलवाद आणि भूमिगत नक्षलवाद यातील परस्परसंबंध समजायला महत्त्वाचे आहेत.

अनेक कविता आणि भाषणांद्वारे उघडउघड नक्षलवादाचे समर्थन केले गेले. अनेक नक्षल समर्पित शहरी संघटनांच्या जडणघडणीत य सर्वांचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. यापूर्वी नक्षलवादाच्या अनुषंगाने त्याच्यावरही कारवाई झाली, पण विचाराची कास त्याने  कधीच सोडली नाही. एक कथा आहे, सत्यमुर्ती ह्या कोंडापल्लीच्या बरोबरी च्या साथीदाराला नक्षलवादातून १९८६ ला काढून फेकले, कारण तो चळवळीत चालणाऱ्या जातीवाद विरोधात बोलायचा आणि आंबेडकरवाद सांगायचा. त्याचे खंडन करायला आणि नक्षलवादीची अब्रू वाचवायल शहरी व्यक्ती म्हणजे वरावरा राव! कालपरवा भाषणात आदिवासी आणि दलित समाजाला नक्षलवादाचे स्वाभिमान मिळवून दिल्याचे भाष्य करतो.  हे राजकारण कशाला? हे उघड आहे. जेव्हा आदिवासी आणि दलित चळवळी जवळ करा, हे नक्षलच्या डॉक्युमेंट मध्ये जाहीर होते. अशी सर्व समिकरणे, शहरी नक्षलवाद आणि भूमिगत नक्षलवाद यातील परस्परसंबंध समजायला महत्त्वाचे आहे.

● नक्षलवादाचे उद्देश्य ; काल आणि आज :

नक्षलवादी पूर्वीसारखे नाही राहिले, ते आत केवळ दरोडेखोर आणि स्वार्थी झाले आहेत. ते मूळ विचारांपासून भटकले आहेत. आज अन्याय अत्याचार आहे, समाजात आर्थिक विषमता म्हणून नक्षलवाद आहे इत्यादी चर्चा समाजात आहेत. याआधी नक्षलवाद न्यायाची लढाई होती, ती आज वाईट झाली आहे, हे सांगण्याचा हेतू असतो आणि मूळ नक्षलवाद न्याय आणि देशहिताचा ठरविला जातो. यातील वास्तव समजायला, नक्षलवादाचे पार्टी दस्तावेज हे उत्तम उत्तर आहे. कोणत्याही चळवळीत काही चांगल्या-वाईट प्रवृत्ती प्रसंगावधानाने येतातच. मात्र नक्षलवाद्यांच्या मूळ संकल्पनेत मागील ५० वर्षात मात्र काहीच बदल आले नाही.  वेळेप्रमाणे केवळ युद्ध पद्धतीत आधुनिकता आलेली आहे. ते मूळ उद्देशासाठी आजही कटिबद्ध आहे. समयसुचकता बघून, वेळेप्रमाणे काही सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न नक्षलवाद्यांकडून दूरदृष्टीने हाताळले गेले आहेत. त्यामुळे नक्षलवाद काल फार चांगला होता, तो आज फार वाईट झाला! हे म्हणणे, ‘नक्षलवाद’ विषयी सामान्य लोकांच्या मनात आस्था (sympethi) निर्माण करण्यासारखे आहे. साधारण लोक, ‘हिंसा अयोग्य, पण नक्षलवाद चांगले’ ही मांडणी करतात. हे शहरी लोकांचे समर्थन मिळवायला केलेले नक्षलवाद्यांचे शहरी राजकारण आहे, ज्याला असंख्य लोकं बळी पडले आहेत.
 

● शहरी (फ्रंट) संघटनाची भूमिका :

नक्षलवादाचे मूळ उद्देश हे त्यांच्या कागदपत्रांमध्ये वेळोवेळी स्पष्ट केलेले आहेत. त्यात चारू मुजुमदारने १९६५ मध्येये म्हटले आहे, “Collect arms and build up bases of armed struggle in rural areas.” तो पुढे सत्ता काबीज करायला म्हणतो, “सगळ्या ट्रेड युनियनच्या मजुरांना संघटित करा” कशाला? तर “to propagate the politics of armed struggle and gun-collection campaign, and build up Party Organisation.” साम्यवादी क्रांती लवकर यशस्वी करायची असेल, तर ‘एक राष्ट्रीय फ्रंट’ स्थापित करायला पाहिजे. ह्या फ्रंट संघटनेत, भारताविरूद्ध लढणाऱ्या सगळ्या फुटीरतावादी संघटना आणि काही समविचारी संघटनाशी जमेल त्या स्तरावर हात मिळवणी करून देशाला/ शासनाला विचलित आणि कमजोर करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर क्रांती सेनेला आक्रमण करणे सोपे असेल. ही फ्रंट संघटना अर्थातच शहरात आणि खेड्यात आवश्यक असल्याचे तो सांगतो. ह्या फ्रंटचे महत्व सांगताना चारू म्हणतो, “रशियन क्रांती यशस्वी झाली कारण तिथे, युनायटेड फ्रंट संघटनांचा सुयोग्य झालेला वापर होय. भारतातसुद्धा लढा जिंकायला युनायटेड फ्रंट तेवढेच महत्त्वाचे आहे”. तो पुढे सांगतो, भारत, नागा, मिझो, काश्मीर आणि अन्य भागांत “struggles are being waged under petty-bourgeois leadership. In the democratic revolution, therefore, the working class will have to march forward by forming a united front with them.” “देशात, काश्मिरी, खालिस्तान, तेलंगणासारखे सशस्त्र उठाव चालूच आहेत. त्यांना एक छत्री माओवादी संघटनेत जमेल त्या स्तरावर आपल्या नेतृत्वात आणायला पाहिजे. त्याच्या मते, देशात असंख्य शासनविरोधी भूमिकेतून असंतुष्ट संघटना काम करतात किंवा काही विशिष्ट घटनेमुळे भावनात्मक कारणासाठी संघटना उदयाला येतात. ह्या देशविरोधी नसल्या, तरी अशा संघटनेचे बळ मिळविणे माओवादी चळवळीसाठी पोषक आहे.”  

प्रातिनिधिक छायाचित्र स्रोत 

चारु भारतातल्या सगळ्याच राज्यातील देशविरोधी संघटनेशी हात मिळवणी करायला सांगतो,  तो म्हणतो, “या संघटना केवळ भूमिगत राहून काम करीत नाही. शहरात वेगवेगळ्या उद्देशाने लोकशाही पद्धतीने, पण देशविरोधी योजनांसाठी आवश्यक असतात, त्याचा फायदा साम्यवादाच्या चळवळीसाठी घेतला पाहिजे”. यात नक्षलवादी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले. अशा सर्व संघटना नक्षलवादाच्या फ्रंट संघटना असल्याचे आणि त्यांचे फुटीरतावादींसोबत महत्त्वाचे संबंध इत्यादीबाबत साहित्यात मान्यता आहे. त्यांच्यानुसार, “विद्यार्थी संघटना किंवा वेगवेगळ्या असंतुष्ट लोकांच्या संघटना देशविरोधी वातावरण तापवत असतात. अशा संघटनेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शिरून त्यांना आपल्या फायद्यासाठी एकसुत्र नक्षल संघटनेत सामील केले पाहिजे.” तो पुढे म्हणतो, “The political organization of the youth and the students must necessarily be a Red Guard organization.” अर्थातच, ह्या विद्यार्थ्यांना माओ चे सशस्त्र क्रांतीचे विचार सर्व स्तरावर पेरायचे आहेत. अशा सर्व संघटना जंगलात आणि शहरात वेगवेगळ्या स्तरावर काम करायला महत्त्वाच्या आहेत. चारुला शहरी चळवळींच्या लोकशाही पद्धतीवर फार विश्वास नव्हता. पण सशस्त्र चळवळ तत्काळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. तेव्हाच, चिनी नेत्यांप्रमाणे क्रांतीसाठी जण-आंदोलनावर (Mass Movements) अधिक भर देणे आवश्यक असल्याने, नक्षलवादाचे शहरी समीकरण हे नेहमीच अशा चळवळींसाठीची प्राथमिकता राहिली आहे.

नक्षलवादाच्या यशासाठी शहरी फळीचे महत्व १९८०ला उदयास आलेल्या PWG पासून दिसून येते. त्याचे संस्थापक कोंडापल्लीने अनेक फ्रंट संघटनाचे सुसूत्र नियोजन केले. गदर प्रमाणे अनेक कवी, शाहीर, गायक, विद्यार्थी आणि प्रभावी लेखक इत्यादी हे नक्षल चळवळीत उभे करून, शहरात त्यांच्याच प्रभावातून राजरोसपणे हिंसक नक्षल चळवळ पुढे रेटली गेली. पुढे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वेसर्वा ‘गणपती’ यानेही शहरी नक्षलवादाचे समीकरण १९९२ नंतर त्यांच्या सुधारित कार्यक्रमात मांडले. तेव्हापासून ही केवळ एक राजकीय चळवळ न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतक चळवळ करून ठेवल्याने, उघड उघड लोकशाहीच्या सीमेत राहून प्रस्तापित लोकांच्या संघटना उभारणे, त्यांच्याच प्रसिद्धीचा आणि प्रतिष्ठेचा वापर करून गावात किंवा शहरात अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम उभारणे, त्यांतून सामान्य लोकांना प्रेरित करणे, लोकांना व्यवस्थेविरूद्ध भडकावणे आणि प्रभावित झालेल्या लोकांना, विशेषतः तरुणांना हळूच हिंसक चळवळीत सामील करणे, इत्यादी शहरी कार्यक्रमाचे उद्देश राहिले आहेत. बंदूक घेण्यापेक्षा हे ‘शहरी राजकारण’ अधिक महत्त्वाचे होते.  क्रमशः

लेखक: प्रा. श्रीकांत मिरा बळीराम भोवते
संपर्क क्र. ९४२०३०४०२४
ईमेल : bhumkalorg@gmail.com,

लेखक नागपूर येथील भुमकाल संघटनेचे सचिव असून मनोहरभाई पटेल महाविद्यालयात सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

◆◆◆

 

(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, मराठी ब्रेन त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: