‘सिडीसी’ व विविध संस्थांनी जाहीर केलेली कोरोनाची नवी लक्षणे
अमेरिकेच्या ‘रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र’ने (CDC : Centre for Disease Control & Prevention) कोरोना विषाणूची नव्याने दिसणारी लक्षणे जाहीर केली आहेत. तसेच, युनायटेड किंगडम सरकारनेदेखील सातत्याने खोकला येणं, तोंडाची चव जाणं, वास न येणं ही नवी लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
ब्रेनविश्लेषण | अनुराधा धावडे
जगभरात सुमारे ७३ लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे, तर भारतात ‘कोव्हिड-१९‘ बाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यातच महाराष्ट्रात तब्बल ९४ हजार लोक कोरोना संक्रमित आहेत. भारतातील ही आकडेवारी पाहता कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनानेे देशातल्या कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 30 जूनपर्यंत ‘टाळेबंदी-५’ची (Lockdown 5) घोषणा केली. तर, 8 जूनपासून देशात महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोठ्या प्रमाणात शिथिल केले आहेत.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांतील कोरोना विषाणू आणि त्याच्या संक्रमणाबद्दल आपल्याला बरीच माहिती मिळाली आहे. मात्र, जसजशी रुग्णांची संख्या वाढत आहे तसतशी कोरोना विषाणूच्या लक्षणांची नवनवी माहितीही समोर येत आहे. सुरुवातीला कोरोनाच्या लक्षणांच्या यादीत ताप किंवा थंडी वाजणे, अंग थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे अशी सुरवातीची लक्षणे सांगितली होती. मात्र, जसजसे रुग्ण वाढत गेले, तसतसे रुग्णांमध्ये नवी लक्षणेही दिसू लागली.
त्यानंतर आता अमेरिकेच्या ‘रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र’ने (CDC : Centre for Disease Control & Prevention) कोरोना विषाणूची नव्याने दिसणारी लक्षणे जाहीर केली आहेत. थकवा येणे आणि तोंडाची चव जाणे हीदेखील नवी लक्षणे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर, आता युनायटेड किंगडम सरकारनेदेखील सातत्याने खोकला येणं, तोंडाची चव जाणं, वास न येणं ही नवी लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

● कोरोनाची नवी लक्षणे कोणती?
‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ ) तिच्या वेबसाईटवर कोरोना व्हायरसमुळे जाणवणाऱ्या 13 लक्षणांची यादी दिली आहे. यातलीव सर्वसामान्य लक्षणं आपल्याला माहितीच आहेत. पण, आता जगभरातल्या काही रुग्णांमध्ये काही नवी लक्षणे दिसून आली आहेत. यांमध्ये –
– कंजंक्टीवायटीस (डोळे येणे)
– त्वचेवर लाल चट्टे, पुरळ उठणे
– हातापायांच्या बोटांवर, तळव्यांवर चट्टे उठणे
– अतिसार किंवा हगवण लागणे
– अंगदुखी
– गंभीर लक्षणे
– छाती दुखणे
– छातीवर दबाव आल्यासारखं वाटणे
– वाचा जाणे
– शरीराची हालचाल थांबणे
ब्रेनविश्लेषण : ‘कोव्हिड-१९’चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात !
● लक्षणे समजून न आल्यास मृत्यूचा धोका किती ?
कोरोना विषाणूमुळे मरणाऱ्यांचे प्रमाण जवळपास 1 ते 2 टक्के इतकेच आहे, पण हे आकडे पूर्णतः विश्वासार्ह नाहीत. काही ठिकाणी रोगाचं निदान करण्याची पुरेशी व्यवस्था नाही, तर काही दुसऱ्या ठिकाणी लक्षणं दिसत नसल्यामुळे रुग्णांची ओळखच पटत नाही.

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने सुमारे 65 हजार रुग्णांवर केलेल्या अभ्यासानंतर काही नवीन महिती समोर आली आहे. यात 6 टक्के रुग्णांची फुप्फुसे निकामी होणे, त्यांना इतर संसर्ग होणे, अवयव निकामी होणे, परिणामी मृत्यू ओढवणे अशा चिंताजनक परिस्थितीत पोहोचतात. तर 14 टक्के रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी गंभीर लक्षणं दिसतात. त्याचबरोबर, सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये ताप, खोकला किंवा न्युमोनियाची लक्षणे दिसणे, अशी सौम्य लक्षणं दिसतात.
आतापर्यंतच्या आकडेवारीवरून असं लक्षात येतं की ज्यांना आधीच कुठला ना कुठला आजार आहे, जसं की दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, त्यांना या रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. आकडेवारी असंही सांगते की पुरुषांच्या जीवाला महिलांपेक्षा जास्त धोका आहे. मात्र कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी ज्या उपाययोजना शासनाने सांगितल्या आहेत, त्याचं पालन करणे हा एकमेव उपायच आपल्याकडे आहे.
गिलोय आणि अश्वगंधा कोरोनाची साखळी तोडण्यात 100 टक्के प्रभावी
म्हणजेच, आजारी व्यक्तींच्या फार जवळ जाऊ नका, हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका, शिंकताना आणि खोकलताना टिशू पेपर वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा, साबणाने नियमित हात धुवा, तसेच बाहेर जाताना, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, आदि उपाययोजनांच आपल्याला ‘कोव्हिड-१९’ या महामारीपासून दूर ठेवू शकतात.