Site icon MarathiBrain.in

कोरोना रुग्णांवरील अ‍ॅझीथ्रोमायसीनचे वापर थांबवणार : आयसीएमआर 

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

कोरोना विषाणूची सौम्य तसेच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करताना   हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळ्यांची मात्रा दिली जाते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना रुग्णांवर उपचारांसाठी ही दोन औषधे सुचवली होती. मात्र, आता अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी करू शकते. परिणामी, नव्या उपचार पद्धतीमध्ये ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन‘चा (HCQ) वापर कायम राहिल, पण अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर बंद केला जाऊ शकतो, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

आयसीएमआरच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “एचसीक्यूसह अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या वापरामुळे हृदयावर परिणाम होत असल्याने या गोळीचा वापर थांबवला पाहिजे. त्याजागी डॉक्सीसायक्लीन किंवा अ‍ॅमॉक्सीसायक्लीन या औषधांचा वापर केला जाऊ शकतो, यामुळे ह्दयावर कुठलाही परिणाम होत नाही.”

भारतात ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा वापर सुरूच राहणार : आयसीएमआर

सोबतच, एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीत विग म्हणाले, “भारतात ‘कोव्हिड-१९‘ गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता जास्त भासत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमित सौम्य रूग्ण किंवा गंभीर रूग्ण असोत, सर्वात मोठा घटक म्हणजे ऑक्सिजनेशन आहे. कोरोना विषाणूच्या उपचारातील प्रतिविषाणू (Antiviral) औषधे जास्त प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. सुरुवातीपासून अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यू देण्यात येत होते. मात्र, आम्ही संशोधनानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की, अ‍ॅझिथ्रोमायसिनची आता आवश्यकता नाही आहे.”

‘कोव्हिड-१९’चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात !

● अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर कशासाठी केला जातो?

‘अ‍ॅझिथ्रोमायसिन’ एक प्रकारचे प्रतिजैविक (अँटीबायोटिक) औषध आहे, जे विषाणूंच्या (बॅक्टेरिया) वाढीस प्रतिबंधित करते. अ‍ॅझिथ्रोमायसिन न्यूमोनिया, ब्राँकायटिस, कान, घसा, फुफ्फुसाचा संसर्ग आणि लैंगिक संबंधातून पसरणारे आजार अशा विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. यासाठी अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर केला जातो.

 

Exit mobile version